Advertisement

स्रीयांनी शिक्षण घेवून आत्मनिर्भर बनावे- डॉ.ऊर्मिला ठाकरे*खामगाव/(संतोष आटोळे )

*स्रीयांनी शिक्षण घेवून आत्मनिर्भर बनावे- डॉ.ऊर्मिला ठाकरे*
खामगाव/(संतोष आटोळे ) *सरस्वती नगर, खामगाव येथे दि. ८ मार्च २०२६ रोजी बहुउद्देशीय समाज जागृती महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या 'कर्तृत्ववान महिलांचा गौरव', विविध विषयांवर 'महिला परिसंवाद' तसेच 'महिलांच्या नेतृत्वगुणांना', प्रोत्साहन मिळावे म्हणून 'विशेष बौद्धिक खेळ, नृत्य,वेशभूषा' असे विविध प्रेरणादायी उपक्रमाचेही आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या तथा साहित्यिका डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे  ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.संध्याताई पद्मने,सौ.शोभा वानखडे,सौ.सुवर्णा गव्हाळे,सौ शितल चिमणकर,सौ.इंदुताई शेगोकार उपस्थित होत्या*
          *सुरूवातीला जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.*

         *प्रास्ताविक सौ.शोभा गोपाल वानखडे यांनी केले.*
*अध्यक्षीय भाषणात डॉ.*
*ऊर्मिलाताई ठाकरे म्हणाल्या की, संविधानाचे वाचन करून आपले अधिकार व कर्तव्याची जाण ठेवली पाहिजे.गाडी,माडी,साडी,*
*केशभूषा,वेशभूषा म्हणजे सक्षमीकरण नाही,तर महिलांनी शिक्षणा सोबत चाकोरी बाहेरील शिक्षण घेवून आत्मनिर्भर बनले पाहिजे व आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे.स्त्री ही निर्माती आहे. स्री मुळेच जग सुंदर आहे,असे प्रतिपादन केले.*  *क्रमशः महिला परिसंवादात सौ.संध्या पदमने,सौ.शोभा वानखडे,सौ.सुवर्णा गव्हाळे, सौ.प्रमिला पानझाडे,सौ.*
*वनिता निंबोळकर,सौ.नेहा राजगुरू,सौ.मंजुळा डुकरे, सौ.इंदुताई शेगोकार,सौ.शितल चिमणकर,सौ.प्रमिला निंबोळकर,सौ.सुनंदा पानझाडे,सौ.सविता डुकरे,सौ.रेखा निंबोळकर...आदिंनी सहभाग घेतला.*
          *यावेळी बौद्धिक खेळ, नृत्य,वेशभूषा या कार्यक्रमात सौ.संध्या सुरडकर, सौ.शुभांगी, इंगळे,सौ. कमल वाघमारे, सौ.कामिनी चिम,सौ.उषा चंदनकार,,सौ.सुवर्णा गव्हाळे, सौ.ललिता नजरधने,सौ.राजकन्या माठे सौ.मंजुळा डुकरे,सौ.नेहा राजगुरू,सौ.मीरा वानखडे,सौ.कल्पना चिमकर,सौ.गीता वानखडे,सौ.संगीता काकडे,सौ.यशोदा पानझाडे,सौ.मंदा माठे,सौ.उज्वला शेगोकार,सौ.शोभा वानखडे,सौ.मंगला तायडे...आदिंनी सहभाग घेतला.*
          *कार्यक्रमाचे संचालन कु.ईशा गोपाल वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मंजुळा डुकरे यांनी केले.*
          *कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.गोपाल वानखडे,श्री.बाळू गव्हाळे,कु.ईशा वानखडे यांनी परिश्रम घेतले.*

Post a Comment

0 Comments