Advertisement

भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त निघ्ाालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत* खामगांव(संतोषआटोळे )

*भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त निघ्ाालेल्या शोभायात्रेचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले स्वागत* 
खामगांव(संतोषआटोळे )
शुक्रवार दि.20 मार्च 2026 रोजी सिंध्ाी समाज बांध्ावांचे आराध्य दैवत श्री भगवान झुलेलाल यांच्या जयंती सिंधी समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.झुलैलाल जयंतीनिमित्त सकाळी शहरातुन भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली.सायंकाळी 6 वाजता पुज्य सिंधी पंचायत व पुज्य बहावलपुरी सिंधी समाज बांधवांच्या वतीने आठवडी बाजार येथील श्री गुरुनानक देवजी मंदिरापासुन आकर्षक रथामधुन न भगवान झुलेलाल यांच्या पुतळयाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सिंधी समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने सहभागी झाले होते.ही शोभायात्रा सानंदा निकेतन समोर आली असता फटाक्यांची भव्य आतिषबाजी करुन शोभायात्रेचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी आकर्षक अश्वरथामध्ये असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या पुतळयाला हारार्पण करुन पालखीचे दर्शन घ्ोतले व मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या सिंधी समाज बांधव-भगिणींना भगवान झुलेलाल जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी पुज्य सिंधी पंचायतचे अध्यक्ष हिरासेठ नथ्थाणी,लालुसेठ भोजवानी,राहुल पेशवानी,अमित नागरानी,कपिल पमणानी,ॲड.दिनेश वाधवाणी,मनिष नागराणी, पत्रकार अशोक जसवाणी,किशोर भोजवानी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाध्यक्ष मनोज वानखडे,संजुभाऊ शर्मा,रवि जोशी,राम बुरंगे,प्रफुल्ल कुळकणी,अविनाश ढगे,प्रफुल पाटील, रोहित राजपुत,आनंद किलोलीया,वैभव वानखडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा पुज्य सिंधी पंचायतच्या वतीने  भगवा शिरोपा देवुन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments