Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त अभिवादन. खामगाव/(संतोषआटोळे )

*भारताला मजबुत आणि लोकशाही प्रधान संविधान देवुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिशा दिली .....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंतीनिमित्त अभिवादन. 
खामगाव/(संतोषआटोळे )
मंगळवार  दि.14 एप्रिल 2026 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानाजवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला हजारो बौध्द समाज अनुयायांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयासमोर अभिवादन कार्यक्रम पार पडला.यावेळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर ते देशातील प्रत्येक नागरीकाला समानता,स्वातंत्र आणि न्याय देणारे मार्गदर्शक दिप आहे. भारतीय संविधानाने लोकशाहीला बळ दिले आणि प्रत्येक नागरीकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला.भारताला मजबुत आणि लोकशाही प्रधान संविधान देवुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिशा देवुन प्रत्येक नागरीकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असे 
त्यांनी सांगितले.  

  यावेळी भारतीय बौध्द महासभेचे शहरअध्यक्ष दादाराव हेलोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,खामगाव कृ.उ.बा.स.चे संचालक विलाससिंग इंगळे,संजय शर्मा,नगरसेवक तहेसीन शाह,अजीम कुरेशी,मो.सहेलीम,निलेश तासतोडे, श्याम मोरे ,केशव कापले,अक्षय मिरगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
  सर्वप्रथम महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले व उपस्थितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा.आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या वतीने उपस्थितांना जयंतीनिमित्त लाडु वाटप करुन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.यावेळी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,भीम भगवान की जय,एकच साहेब बाबासाहेब अश्या घोषणा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments