Advertisement

फुले दांपत्य 2026 च्या पुरस्काराने आत्मसन्मान चे पाटील दांपत्य सन्मानित*खामगांव /(संतोष आटोळे)

*फुले दांपत्य 2026 च्या पुरस्काराने आत्मसन्मान चे पाटील दांपत्य सन्मानित*
खामगांव /(संतोष आटोळे)
          खामगाव आत्मसन्मान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ विजय पाटील व त्यांची सुविद्य पत्नी शुभांगी पाटील या दाम्पत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती मलकापूर तर्फे देण्यात येणारा फुले दांपत्य 2026 चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा 11 एप्रिल 26 रोजी मलकापूर येथील शहीद संजय सिंग राजपूत स्मारक येथे पार पडला डॉ विजय व शुभांगी पाटील या दाम्पत्याला बहुजन उद्धारक सेवा समिती मलकापूरचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला या पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ यांचा समावेश होता



 पाटील दांपत्याचे असे अनमोल कार्य

 आत्मसन्मान फाउंडेशनच्या माध्यमातून पाटील दांपत्याने आपल्या सहकारी मित्रांसह शेकडो मनोरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे ...शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना मदतीचा हात त्यामुळे हे विद्यार्थी आज आपल्या पायावर उभे आहेत डोळ्यांनी दिसत नसल्याने अंधकारमय जीवन जगणाऱ्या रुग्णांना ऑपरेशन साठी मदतीचा हात दिला आहे त्यामुळे या अंध रुग्णांना आपल्या डोळ्याने जग पाहता येत आहे या कार्यासह अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन अनेकांना मदतीचा हात गेला आहे त्यांचे हे कार्य पाहून बहुजन उद्धारक सेवा समिती मलकापूर तर्फे या दापत्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे....

Post a Comment

0 Comments