*एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून गौ वंश वर उपचार*
गौ सेवेत सदा अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन कडून खामगांव शहरातील बेवारस गौ वंश वर उपचार करण्यात आले. येथील आठवडी बाजार स्थित एक नंदीच्या शिंगेला दुखापत होऊन त्याच्या मागच्या पायाची नस कटून तो गंभीर जखमी अवस्थेत जास्त प्रमाणात रक्तस्त्राव वाहून गेल्याने तो रक्त बंबाळ अवस्थेत होता एकनिष्ठा गौ सेवकांनी लगेच त्याच्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविला. आठवडी बाजार स्थित एक वासरूला मोठ्या प्रमाणात विष बाधा झाली होती त्या वासरूवर उपचार करण्यात आले परंतु दुर्दैवाने तो मृत्युमुखी पडला. सिव्हिल लाईन स्थित एक गौ माता विष बाधा होऊन मृत्युमुखी पडलेली होती घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवकांनी नगर परिषद ला माहिती देऊन तिचा अंतिम संस्कार करायला लावला. समन्वय नगर स्थित एक गौ माता दोन दिवसा पासून रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत तडफडत होती तिच्यावर उपचार करून तिला वाचविण्यात गौ सेवकांना यश आले. जगदंबा चौक स्थित एका नंदिच्या पायाला मुका मार लागलेला होता गौ सेवकांनी लगेच उपचार करून त्याचा पाय चांगला केला. बारादरी स्थित एका गौ मातेच्या समोरच्या पायाच्या खुरात जखम झाली होती तिच्यावर उपचार करून तिची जखम बरी करण्यात आली. मेनरोड फरशी भागात एका नंदीच्या समोरच्या पायाला दुखापत होऊन तो तडफडत होता त्या नंदीवर लगेच उपचार करण्यात आले. पाण्याची टाकी वामन नगर स्थित एक गौ माता प्रसूती दरम्यान शॉक मध्ये गेलेली होती तिच्या पोटात वासरू आडवा होऊन फसलेला होता तिच्यावर उपचार करून वासरूला वाचविण्यात डॉक्टर गौ सेवकांना यश आले परंतु
दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ती बेवारस गौ माता शांत झाली. अमृत नगर स्थित एका नंदीच्या पाठीच्या मागे मोठ्या प्रमाणात जखम होऊन त्याच्यात अळ्या पडलेल्या होते गौ सेवकांनी लगेच उपचार करून नंदीला चांगले केले. या गौ सेवेत एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनचे गौ सेवक सुरजभैय्या यादव, डॉ. शुभम जरांगे, डॉ. पवन घडेकर, ज्ञानेश सेवक सर, योगेश राऊत, नरेश मसनेवार, आकाश शेंबरे, निलेश हजारे, राहुल नाटेकर, अजय वानखडे, मनिष सिरसाठ, प्रमोद ढोलेकर, भारत इंगळे, दिपक महाकाळे, योगेश ईर, स्वप्निल दांदळे, शुभम, आर्यन निळे, करण ठाकुर, करण मोरे, पृथ्वी जाधव, गौरव कवटेकर, प्रदीप शमी, आशिष शर्मा, चेतन कदम, विशाल ठाकुर, अविनाश इंगळे, सागर अवसरमोल, लखन पिवाल, संतोष जाधव आदि लोकांनी एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे गौ वंश वर उपचारासाठी परिश्रम घेतले या गौ सेवेत संपूर्ण लागलेला खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आला. अशी माहिती स्वप्निल दांदळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मागील मार्च महिन्या पासून तर आज दिनांक 14 एप्रिल पर्यंत वेगवेगळ्या घटनेत जखमी गौ वंश वर उपचार करण्यात आले.हे विशेष.
0 Comments