Advertisement

अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवसेना खामगाव विधानसभेच्या निमशासकीय अशा BLA1 प्रमुख पदी हिंदू सेवक अँड अमोल भाऊ अंधारे व जळगाव जामोद विधानसभेच्या निमशासकीय BLA1 पदी श्री चेतन पाटील घिवे यांची नियुक्ती* खामगांव /(संतोष आटोळे )

*अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवसेना खामगाव विधानसभेच्या निमशासकीय अशा BLA1 प्रमुख पदी हिंदू सेवक अँड अमोल भाऊ अंधारे व जळगाव जामोद विधानसभेच्या निमशासकीय BLA1 पदी 
श्री चेतन पाटील घिवे यांची नियुक्ती* 
खामगांव /(संतोष आटोळे )
आज दिनांक 16/04/2026 रोजी  सखोलपुनरीक्षण २०२६ करिता पक्षाचा अधिकृत बूथ लेवल एजंट (बीएलए) नियुक्तकरणेकरिता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्राधिकृत व्यक्ती म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने व केंद्रीय मंत्री मा.ना.श्री प्रतापराव जाधव साहेब व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धर्मवीर आमदार संजयजी,गायकवाड,जिल्हाप्रमुख श्री संतोष डीवरे पाटील यांचे मार्गदर्शनात.
शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे साहेब यांचे स्वाक्षरीने,शिवसेना बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख श्री संजयजी सोनार साहेब यांनी पत्रकान्वये खामगांव विधानसभा बी एल ए पदी शिवसेना युवा नेते ॲड श्री अमोल अंधारे व जळगाव जामोद विधानसभेच्या निमशासकीय अशा BLA1 पदी 
श्री चेतन पाटील घिवे यांची 
यांची नियुक्ती करण्यात आली आहें.

या Bla नियुक्ती मुळे पक्ष संघटन मजबूत,बळकट होईल असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी व्यक्त केला.
BLA1 पक्षाचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेतील सर्व बुथ वरती BLA2 निवड करतील आणि बी एल ए टू शासकीय बीएलओ यांच्यासोबत प्रत्येक बुथ पातळीवर sir सर्वे मध्ये सक्रिय सहभाग घेऊन,मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करणे,नाव वगळणे,लग्न झालेल्या महिलांचे वडीला कडील पुरावे गोळा करून शासकीय बीएलओ यांना मदत करतील,sir 2002 ते 2024 पर्यंत अत्यंत महत्त्वाचा सर्वे असल्यामुळे गावातील बीएलओ यांच्यासोबत संपर्क साधून आपल्या बूथ मतदार यादीतील नाव कमी होणार नाही याची दक्षता घेतील,वडीलाकडील पुराव्या अभावी मतदार यादीतील नाव कमी झाल्यास आपणास अपील करण्याची संधी देण्यात येईल परंतु आपण अपील न केल्यास किंवा आपण पुराव्या अभावी मतदार यादीतून नाव कमी झाल्यास भारत देशाचे नांगरित्व जाण्याची दाट शक्यता आहे. याकरिता आपण एस,आर,आय  सर्वे अत्यंत महत्त्वाचा असून त्यामध्ये सहभाग घेऊन आपले नाव यादीमध्ये आहे किंवा नाही हे तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे, याच करिता (बीएलए)वन व बी,एल,ए टू,अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जात आहे. (बीएलए) दोन करिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे,शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे,युवा सेना शहरप्रमुख राहुल कळमकार,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.

Post a Comment

0 Comments