Advertisement

*गौ माता आणि इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करून देण्याबाबत व गौ पालक यांच्यावर कडक कार्यवाही करणेबाबत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*खामगांव(संतोषआटोळे)

*गौ माता आणि इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करून देण्याबाबत व गौ पालक यांच्यावर कडक कार्यवाही करणेबाबत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*
खामगांव(संतोषआटोळे)
शहरात ठिकठिकाणी गाई आणि इतर मोकाट प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी. वाढत्या तापमानामुळे मोकाट प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होत नाही आणि त्या प्राण्यांची योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारनी गौ मातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे परंतु सध्या तिचे भयंकर हाल होत आहे ही बाब चांगली नाही आहे. आपल्या धर्मात आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यात या प्राण्यांची महत्त्वाची भूमिका आहे म्हणून आपणांस नम्र विनंती की आमच्या या मागणीला स्वीकारून संपुर्ण खामगांव शहरामध्ये मुख्य योग्य ठिकाणी गरजू प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी. व तसेच जे गौ पालक आहेत ते आपल्या मालकीचे गौ वंश रस्त्यावर मोकाट सोडून देतात काही मोकाट गुरे गाई रोज बेवारस परिस्थितीत रोडवर असतात याचा फायदा घेत काही चोरटे गौ तस्करी करत आहे.सध्या गौ वंश चोरीच्या घटनेत दिवसा दिवस वाढ होत चाललेली आहे. भविष्यात पुन्हा अश्या घटना घडू नये या करीता नगर पालिकेने जे


 रस्त्यावर मोकाट गौ वंश सोडतात त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी आणि प्लास्टिक पॉलिथिंग बंद करावी बरेच वेळा आमच्या निर्दे्शनास आलेले आहे की कुडा कचऱ्याचा मोठा ढीग काही लोकं रस्त्याच्या बाजूला लावतात तेच प्लास्टिकच्या कैरीबैगा मोकाट गौ वंश खात असतात मग विष बाधा होऊन मरण पावतात आपण अश्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करावी.प्लास्टिक कैरीबॅग वर बंदी घालावी ही नम्र विनंती या निवेदना द्वारे आपणास आम्ही करत आहे. जर आमच्या निवेदनाची दखल घेतल्या नाही गेली तर आम्ही लोकशाही मार्गाने नगर पालिके समोर मोठे आंदोलन छेडू असा ईशारा एकनिष्ठा गौ सेवा कडून देण्यात आला या निवेदनावर सुरज यादव, सौं. लता गावडे, गौरव कवटेकर, राजु बोर्डे, प्रदीप शमी, निखिल शर्मा, सौं. दिपीका वाकोडे, सुरेंद्र चव्हाण, जसविंदर सिंग, विठ्ठल लोखंडकार, अरविंद शिंदे, हरीदास गव्हाणे, मंगेश राखोंडे, रितेश पवार, गणेश जाधव, सिद्धांत उंबरकार, अविनाश विभुते, निलेश इंगळे, जितेंद्र इंगळे, सुरेश नांदोकार, निलेश बरदिया, आनंद देवताळू, अरुण डवले, निलेश राजपूत, संतोष ईटनारे, सुनिल इंगळे, निखिल राणा, शिवचरण लोखंडकार, गोलु यादव, आदि लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments