*बुलढाणा जिल्हा परिषदेचा पॅटर्न! 'मिशन झेड' मुळे गरिबांची मुले गाठणार आयआयटी आणि मेडिकलचे शिखर.*
'मिशन झेड' उपक्रमांतर्गत खामगावात विद्यार्थी-पालक मेळावा संपन्न; गरिबांची मुले होणार डॉक्टर आणि आयआयटीयन्स!
खामगाव (संतोष आटोळे ) समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने 'मिशन झेड' हा क्रांतिकारी प्रकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत खामगाव येथील 'गुंजकर एज्युकेशन हब'मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सभेला विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
राज्यात केवळ बुलढाणा जिल्हा परिषदेचा पुढाकार
बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉ गुलाबराव खरात साहेब यांच्या संकल्पनेतून हा 'मिशन झेड' प्रकल्प आकारास आला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बुलढाणा ही महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंगच्या तोडीचे किंवा त्याहूनही सरस शिक्षण मिळावे आणि ग्रामीण भागातील गुणवत्ता महाराष्ट्राच्या नकाशावर चमकावी, हा मुख्य हेतू खरात साहेबांनी या प्रकल्पामागे ठेवला आहे.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
या सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) डॉ. वैशाली ठग मॅडम, खामगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत साहेब आणि गटशिक्षणाधिकारी उमेशजी जैन साहेब यांचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना यशासाठी प्रोत्साहन दिले.
१०० टक्के निकालाची ग्वाही
'गुंजकर एज्युकेशन हब, खामगाव' येथे सध्या हे विद्यार्थी सराव आणि तयारी करत आहेत. येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये या विद्यार्थ्यांचे निकाल संपूर्ण महाराष्ट्रात चमकतील आणि इथले विद्यार्थी आयआयटी (IIT) व एमबीबीएस (MBBS) मध्ये १०० टक्के प्रवेश घेतील, अशी ग्वाही यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील पालकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा परिषदेच्या या महत्त्वाकांक्षी पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
----------------------------💐💐💐💐
0 Comments