Advertisement

आर्थिक वर्ष अखेरीस खामगांव अर्बन बँकेने कमाविला रुपये ९.८८ कोटी निव्वळ नफा*- *अध्यक्ष प्रा. डॉ. विजय पुंडे

*खामगांव अर्बन बँकेने राखली प्रगतीची गरुड भरारी कायम नेट एनपीए शुन्य*
*आर्थिक वर्ष अखेरीस खामगांव अर्बन बँकेने कमाविला रुपये ९.८८ कोटी निव्वळ नफा*
- *अध्यक्ष प्रा. डॉ. विजय पुंडे*
- खामगांव /(संतोष आटोळे)
सहकारी क्षेत्रात अग्रगण्य खामगांव अर्बन बँकेने आपली शुध्द नफ्याची परंपरा कायम राखत आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२६ अखेर रु. ९.८८ कोटी निव्वळ नफा मिळविला असून ढोबळ नफा रु.३१.४८
कोटी झाला आहे. ढोबळ नफ्यामधून यावर्षी बँकेने काही शाखा रिनोव्हेशन, शिफटींग, नविन शाखा ओपनिंग,
तसेच बी. डी. डी. आर. च्या प्रोव्हीजन्स केल्यानंतर सुध्दा रु.९.८८ कोटी निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाचे सुयोग्य धोरण व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना योग्य दिशेने दिलेल्या मार्गदर्शनामुळे व
सर्वांच्या अथक परिश्रमामुळे खामगांव अर्बन बँक "एक आर्थिक सक्षम बँक" म्हणून नावारुपाला आली आहे. बँकेने
२०२५ २०२६ आर्थिक वर्षात अकोट व मुर्तिजापूर या शहरांमध्ये नविन शाखांचा थाटात शुभारंभ केला आहे.
३१ मार्च २०२६ चे आधारावर बँकेने नियोजनबध्द वसुली केली असून नेट एन.पी.ए. शुन्य टक्के
आहे. बँकेच्या एकूण ठेवी रु. १३२९.५६ कोटी असून यामध्ये लो-कॉस्ट डिपॉझीट रुपये ५२५.२१ कोटी आहे.
लो-कॉस्ट डिपॉझीटचे प्रमाण ३९.५०% आहे, हे प्रमाण इतर सहकारी बँकांच्या तुलनेत खूप जास्त आहे. बँकेने
कर्जाचे व्याजदर माफक ठेवले असून कर्ज वाढीकरीता शाखांद्वारे मार्केटींग टीम व क्रेडीट कॅम्प इ. प्रयत्न केले आहे.


त्यामुळे बँकेची कर्जे रु.७९६.६६ कोटीची आहेत व सी.डी. रेशो ५९.३२% आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप
हंगाम कमी झाल्याकारणाने मार्केट मध्ये जिनींग प्रेसिंग, ऑईल मिल यांची पैशांची विशेष मागणी नव्हती, नाहीतर
यापेक्षा जास्त कर्ज वाटप असते. बँकेचे नेटवर्थ मध्ये अतिशय समाधानकारक वाढ झाली असून नेटवर्थ
रु. १५३.५२ कोटी आहे, सी.आर.ए.आर. २२.७९%, शेअर कॅपिटल रुपये 36.52 कोटींचे आहे तर राखीव निधी रुपये 260.63 कोटी आहे बँकेचे 95% पेक्षा जास्त डिपॉझिट सामान्य आणि 
मध्यमवर्ग यांचे असून यावरून बँकेवर ठेवीदार व सभासदांचा विश्वास दिसून येतो. बँकेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार,सभासद, हितचिंतक,मार्गदर्शक,संचालक मंडळ, व्यवस्थापन मंडळ व कर्मचारी वर्ग यांचा मोलाचा वाटा असून बँकेच्या प्रगतीसाठी अध्यक्ष प्रा. डॉ.विजयजी पुंडे, उपाध्यक्ष डॉ. सतीश जी कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वरजी जाधव तसेच संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. 
          आगामी वर्षात काही शाखांची इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन अधिक व्यवसाय आणणे तसेच बँकेच्या प्रगतीची घोडदौड अशीच कायम ठेवून या आर्थिक वर्षात सुद्धा नवीन शाखा उघडण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री विजयजी पुंडे यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments