Advertisement

राणा लकी सानंदा स्कूल मध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे थाटात उदघाटन संपन्न*खामगांव /(संतोष आटोळे)

*राणा लकी सानंदा स्कूल मध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे थाटात उदघाटन संपन्न*
खामगांव /(संतोष आटोळे)
              राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर मध्ये विध्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या कला व क्रीडा गुणांना योग्य तो वाव मिळावा हा उद्देश लक्षात घेता आणि विध्यार्थ्यांना वर्षभराचे असलेले अभ्यास क्रमाचे टेन्शन दुर झाले पाहिजे. त्यांना त्यांच्याआयुष्यात खेळ किती महत्वाचा आहे हे समजलेच पाहिजे तसेच कला आणि क्रीडाच्या माध्यमातून आपले आयुष्य हे निरोगी व आनंदी कसे राहते शाळेची वार्षिक परीक्षा आटोपल्यानंतर विध्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला पाहिजे शाळेचा प्रत्येक विध्यार्थी हा निरोगी राहिला पाहिजे यासाठी राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवरने क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल
टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योगा यासोबतच संगीत, आणि नृत्य हस्ताक्षर, वाचन, आणि पर्सनल डेव्हलपमेंट या सारख्या विषयाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे खूप मोठ्‌या प्रमाणावर आयोजन केले असून सदर प्रशिक्षण शिबीर हे दि.१०/०४/२०२६ ते
२४/०४/२०२६ रोज सकाळी ८ वाजता पासून ते १० वाजेपर्यंत राहणार आहे. पंधरा दिवसाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीर आज
पासून सुरू झाले असून संस्थेचे अध्यक्ष राणा अशोक कुमारजी सानंदा यांचे शुभहस्ते या सराव शिबिराच्या क्रिकेट मैदानाचे,
बॅडमिंटन मैदानाचे तसेच विविध मैदानाचे विधिवत पूजन करून क्रीडा शिबिराचे उदघाटन केले आपल्या उदघाटनपर भाषणात


त्यांनी जो विध्यार्थी शरीराने तंदुरुस्त तो विद्यार्थी मनाने सुद्धा तंदुरुस्त राहतो आणि मन जर तंदुरुस्त राहिले तर
विध्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत होते सोबतच त्यांनी भविष्यातील भारताची पिढी ही जर का निरोगी आणि सशक्त करायची असेल तर यासारखे समरकॅम्पचे आयोजन प्रत्येक शाळेत वर्षातून किमान एकदा तरी घेतल्या गेलेच पाहिजे असे आपल्या भाषणातून सांगितले व विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात जेवढा अभ्यास महत्त्वाचा तेवढाच खेळ सुद्धा महत्त्वाचा आहे असे खेळाचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर समर कॅम्पचे प्रस्ताविक शाळेचे क्रीडा शिक्षक गुन्हे तायडे सर यांनी केले त्यामध्ये कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 142 असून त्यामध्ये वेळेनुसार विविध गट तयार करून सकाळच्या सत्रात दोन तास क्रिकेट सह इतरही खेळ आणि सायंकाळी फक्त क्रिकेटसाठी सुद्धा अतिरिक्त दोन तास आणि तेही मोफत कुठल्याही प्रकारचा एक रुपया सुद्धा फी न घेता त्यांना राणा लकी सानंदा क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेट शिकविले जाणार आहे.
          या शिबिराचा 24 एप्रिल ला मोठ्या थाटात समारोप सुद्धा होणार आहे असे आपल्या प्रत्येक भाषणातून सांगताना त्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांची नेहमी विविध स्पर्धेमध्ये जिल्हा विभागीय राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे अनेक विद्यार्थी यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व सुद्धा केले असून यामध्ये बडोदा, गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीयकृत स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे तर दिल्ली येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेमध्ये रजत पदक पटकाविले तर हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झालेल्या फेडरेशनच्या कुमार गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत रजत पथक पटकविले आहेत.राणा लकी सानंदा शाळेने महाराष्ट्राला अनेक राष्ट्रीय दर्जाचे उत्कृष्ट खेळाडू दिले असून त्यामुळे महाराष्ट्राला अनेक सुवर्ण आणि रोप्य पदक प्राप्त झाले आहे तर बुद्धिबळ योगासन आणि क्रिकेटमध्ये सुद्धा शाळेने राज्यस्तरावर जाऊन आपल्या शाळेचे व जिल्ह्याचे नाव उंचाविले आहे. याशिवाय शालेय विभागीय स्तरीय मोंटेक्स बॉल स्पर्धेत वीर सानंदा यांच्या कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली शाळेची टीम ही स्पर्धेत अंतिम विजयी ठरली होती हे विशेष उल्लेखनीय आहे.शाळेला क्रीडा वैभवाची खूप जुनी परंपरा आहे असे शाळेचे क्रीडा शिक्षक गणेश तायडे सर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून सांगितले या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री संजयजी शर्मा सर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व विशद करताना निरोगी राहण्यासाठी आणि सशक्त विद्यार्थी घडविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आवडीनुसार खेळात सहभागी झाले पाहिजे असे मार्गदर्शन करून आमची शाळा ही नेहमी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे असे आपल्या भाषणातून सांगितले व विद्यार्थ्यांना मूल्य मार्गदर्शन केले याप्रसंगी शिबिरात सहभागी विद्यार्थी त्यांचे पालक व शालेय सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षका सौ.पुनम गिरी व सौ मीनल तुराळे मॅडम यांनी केले  तर आभार प्रदर्शन सौ शिल्पा देशमुख मॅडम यांनी केले. असे शाळेचे प्रसिद्धी प्रमुख श्री कल्याणसिंह वतपाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  कळविले.

Post a Comment

0 Comments