Advertisement

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले समाज परिवर्तनाचे दिपस्तंभ ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनखामगाव/(संतोष आटोळे )

*क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले समाज परिवर्तनाचे दिपस्तंभ ....माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*  
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
खामगाव/(संतोष आटोळे )
              थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवुन अंधश्रध्दा निर्मुलनासाठी त्यांनी महान कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रामध्ये स्त्रीयांसाठी शिक्षणाचे दालन खुले करुन सुशिक्षीत समाज घडविण्याचे अतुलनीय कार्य केले. शिक्षण,समानता आणि सत्याच्या लढ्यात आपले संपुर्ण आयुष्य अर्पण करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले समाज परिवर्तनाचे दिपस्तंभ आहेत,त्यांच्या थोर कार्याचा सर्वांनी अंगीकार करावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली.शनिवार दि.11 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंपर्क कार्यालय येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होतेे.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुका अध्यक्ष मनोज वानखडे,शेगाव तालुका कार्याध्यक्ष विजय काटोले, बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे,अटाळी सर्कल प्रमुख जयराम मुंडाले, कृष्णा पाटील,केशव खंडारे,सारंगधर खंडारे,पुरुषोत्तम बोचरे,संजय शर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे कार्य हे अथांग सागरासारखे आहे.तरुण पिढीने फुले दाम्पत्यांचा इतिहास घराघरापर्यंत पोहचवुन समतेच्या विचाराला छेद देणाऱ्या प्रवृत्तींना हदद्पार करण्यासाठी संकल्पबध्द व्हावे असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदा देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातुन महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला.    
प्रारंभी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व उपस्थितांना जयंतीनिमित्त पेढे वाटप करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी अमर रहे-अमर रहे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले अमर रहे,जय ज्योती-जय क्रांती, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला एजाज देशमुख,निलेश तासतोडे,पिंटुभाऊ जाधव,प्रफुल कुळकर्णी,सुनिल जाधव,प्रताप कदम,अब्दुल सहेलीम अब्दुल रहेमान, गौरव इंगळे, अभिषेक खंडारे,राजेंद्र खंडारे,गजानन जाधव,शेख अयाज, महादेव खैरे, गजानन मानकर, अरुण निमकर्डे,पवन बोचरे, श्याम गायगोळ,गणेशआप्पा इंगळे, पुरुषोत्तम शेजोळे,विलास पाटील, मनोज खेकडे,अशोकबाप्पु देशमुख,अजय ठाकुर,मयुर सातव,तुषार राजपुत यांच्यासह माळी समाज बांधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments