Advertisement

खामगावात क्रीडा क्रांती! युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये एक महिन्याचे क्रिकेट व विविध आंतरराष्ट्रीय क्रीडांचे भव्य प्रशिक्षण शिबिर*खामगाव/(संतोष आटोळे)

*खामगावात क्रीडा क्रांती! युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये एक महिन्याचे क्रिकेट व विविध आंतरराष्ट्रीय क्रीडांचे भव्य प्रशिक्षण शिबिर*
खामगाव/(संतोष आटोळे)                स्थानिक सूर्योदय एज्युकेशन सोसायटी, खामगाव द्वारा संचलित युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव येथे पालकांच्या विशेष आग्रहास्तव एक महिन्याचे क्रिकेट व विविध आंतरराष्ट्रीय क्रीडांचे भव्य प्रशिक्षण शिबिर दिनांक १५ एप्रिल २०२६ पासून आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. गोपालजी अग्रवाल यांनी दिली.
यापूर्वी शाळेत ४ ते १० वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित उन्हाळी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करत आनंददायी व रोमांचक अनुभव घेतला.
युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव ही शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने उत्कृष्ट उपक्रम राबवत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. गोपालजी अग्रवाल यांनी सांगितले. सोबतच युवराज क्रिकेट अकॅडमी, खामगाव यांच्या माध्यमातून दिनांक १५ एप्रिलपासून ९ वर्षे व त्यावरील मुला-मुलींसाठी एक महिन्याचे उन्हाळी क्रिकेट व इतर क्रीडांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या शिबिरात जिम्नॅस्टिक (रिदमिक, रोप, अॅक्रोबॅटिक्स), कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, जूडो, कराटे, सेल्फ डिफेन्स आदी क्रीडाप्रकारांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच क्रिकेट प्रशिक्षणासाठी रणजी खेळाडू श्री. मुन्ना शबीर, बुलढाणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राज राजपूत, तसेच श्री. खालिद हमदुले, श्री. सर्वेश सर आणि श्री. शेकोकर सर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर शिबिर खामगाव शहरातील सर्व मुला-मुलींसाठी खुले असून जास्तीत जास्त क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवराज क्रिकेट अकॅडमी, खामगाव तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments