*राणा लकी सानंदा स्कूल मध्ये महामानवाची जयंती साजरी*
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दि. १४ एप्रिल रोजी शाळेचे अध्यक्ष
राणा अशोक कुमारजी सानंदा यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी
करण्यात आली.सर्वप्रथम महामानव यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण व पूजन राणा
अशोक कुमारजी सानंदा यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री. संजयजी
शर्मा सर वर्ग दहा च्या शिक्षिका शिल्पा मॅडम, अभिलाषा मॅडम, अर्चना मॅडम, नैना
मॅडम, नेहा मॅडम, पंकज सर आणि वर्ग १०च्या विध्यार्थी यांनी सुद्धा
बाबासाहेबांच्या फोटोचे पूजन केले. यानंतर डॉ.बाबासाहेबांचे कार्य किती महान होते
आणि आपण त्यांचे विचार अंगीकृत करणे आजच्या काळची गरज आहे
शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यासाठी विध्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार
आपल्याअंगी रुजविले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष राणा
अशोक कुमारजी सानंदा यांनी विध्यार्थ्यांना केले. त्यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक
गुणेश तायडे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत, तुम किताबोके सामने
झुक जावो. यही किताबे तुम्हारे सामने एक दिन दुनिया झुका देगी.
असे बाबासाहेबांचे वाक्य शाळेतील विध्यार्थ्यांना सांगितले आणि बाबासाहेब
यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला हेही त्यांनी आपल्या
भाषणातून सांगताना महामानवाला नतमस्तक होऊन त्यांच्या जीवनचरित्र्यावर
प्रकाश टाकत आदरांजली वाहिली यानंतर प्रशांत सर यांनी बाबासाहेबांच्या जीवन
चारित्र्यावर उत्कृष्ट अशी कविता सादर केली. जय हिंद जय भीम नारे देत
कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिलाषा मॅडम यांनी
केले तर आभार प्रदर्शन सौ. शिल्पा मॅडम यांनी केले अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख
कल्याणसिंग वतपाळ यांनी दिली.
0 Comments