Advertisement

खामगाव येथे डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे भव्य स्वागत; हिंदुत्वासाठी संघटित होण्याचे आवाहन*खामगाव (संतोष आटोळे)

*खामगाव येथे डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांचे भव्य स्वागत; हिंदुत्वासाठी संघटित होण्याचे आवाहन*
खामगाव (संतोष आटोळे)  हिंदुत्ववादी चळवळीतील प्रखर नेते, श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. मा. श्री प्रवीणभाई तोगडिया यांचे खामगाव शहरात आगमन झाले असता त्यांचे शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने उत्स्फूर्त व भव्य स्वागत करण्यात आले.
हॉटेल तुळजाई, खामगाव येथे आयोजित सत्कार समारंभास शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन हिंदूसेवक अमोल भाऊ अंधारे व शिवसेना परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.


             या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीणभाई तोगडिया यांनी हिंदुत्वाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य करत सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघटित व सशक्त हिंदू समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. “सशक्त हिंदू, समर्थ हिंदू आणि संघटित हिंदू ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
तसेच, अमोलजी अंधारे यांच्यासोबत गेल्या ४० वर्षांपासून चालत आलेल्या हिंदुत्व कार्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी खामगाव शहराशी असलेले जुने संबंधही अधोरेखित केले. यापूर्वीही खामगावमध्ये विविध सभांच्या माध्यमातून संवाद साधल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात विप्र संघटना खामगाव, हिंदू राष्ट्र सेना, लहुजी सेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ओबीसी संघटना, गौबुक अँप आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. तोगडिया यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी केले आभार शिवसेना शहर प्रमुख चेतन ठोबरे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर डॉ. तोगडिया यांनी अमोलजी अंधारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर त्यांनी अकोला येथे पुढील दौऱ्यासाठी प्रस्थान केले.
या कार्यक्रमामुळे खामगाव शहरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात हा दौरा पार पडला.

Post a Comment

0 Comments