श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) यांना राज्यस्तरीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृसन्मान पुरस्कार २०२६ सन्मानिय आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते प्रदान.. सौ गीता सोनोने
अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.या संस्थेच्या अध्यक्ष सौ.माधुरीताई सचिन चव्हाण. दरवर्षी या संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक,शैक्षणिक, पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवले जातात.
या कार्यक्रमात विशेष उपस्थिती म्हणून अमरावती विधानसभेच्या आमदार सन्माननीय सुलभाताई खोडके उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून, मा.सौ वनिताताई इंगोले, मा. संजीवनी ताई काळे, मा. श्रीमती शोभाताई कंकाळे, आणि प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय डॉ. दिलीप काळे सर (संत गाडगे बाबा विद्यापीठ अध्यासन केंद्रप्रमुख, अमरावती.) सन्माननीय कांचन ताई उल्ले (संचालिका कांचन रिसॉर्ट) सन्माननीय डॉ गौतम मोरे सर (संयोजक सत्याग्रह फोरम,मुंबई) सन्माननीय सारिका ताई गायकी (वैद्यकीय क्षेत्र,) सन्माननीय अनुष्काताई बेलोरकर (सामाजिक कार्यकर्ता) सन्माननीय प्रतिभाताई खापरे (ग्रामगीताचार्य)
आणि कार्यक्रमाध्यक्ष म्हणून सन्माननीय प्रा.सी. ए.डॉ. शंकर अदानी सर (अहिल्यानगर महाराष्ट्र) सन्माननीय डॉ. वैभव निमकर सर (जगविख्यात व्याख्याते) असे अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम कांचन रिसॉर्ट नवसारी येथे थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे
श्रद्धा ताई मंगेश कोल्हटकर यांनीच केले. त्यासाठी त्यांना उत्कृष्ट निवेदिका म्हणून यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
समाजकार्याची जिव्हाळ्याची आवड ही त्यांची ओळख आहे.
प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत, लोकांना सहकार्य करण्यासाठी श्रद्धा tai सदैव तत्पर असतात.
समाजातील प्रत्येक घटकासोबत जोडून घेण्याची आणि त्यांच्या गरजांना समजून घेण्याची त्यांची वृत्ती असल्यामुळे, विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
समर्पण, सकारात्मक दृष्टीकोन आणि मदतीची तयारी हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये आहेत.
या आधी गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान, अकोला यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त श्रद्धा मंगेश कोल्हटकर (डगवार) यांना स्व. सिंधुताई सपकाळ स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला होता.
श्रद्धा कोल्हटकर या शिक्षण, साहित्य आणि कला क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून त्यांचा जीवनप्रवास जिद्द, परिश्रम आणि सतत शिकत राहण्याच्या वृत्तीने समृद्ध झालेला आहे. त्यांनी मातोश्री विमलाबाई देशमुख सीनियर कॉलेज, अमरावती येथे वाणिज्य विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले असून महिला महाविद्यालय ज्युनियर कॉलेज, अमरावती येथे दोन वर्षे अध्यापनाचा अनुभव घेतला आहे.
सध्या त्या K. L. कॉलेज, अमरावती येथे Ph.D. संशोधन विद्यार्थीनी असून त्यांचे एक आंतरराष्ट्रीय व दोन राष्ट्रीय संशोधन पेपर सादर करण्यात आले आहेत. त्यांनी M.A., M.Com आणि B.Ed. ही शिक्षणे पूर्ण केली असून B.Ed. शिक्षणादरम्यान २०२३ साली लालासाहेब देशमुख महाविद्यालय, तिवसा येथे त्यांना “Student of the Year” हा सन्मान प्राप्त झाला.
साहित्य क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. २०२५ साली त्यांना राज्यस्तरीय “Artist of the Year” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. “आई” या काव्यसंग्रहात त्यांच्या १० पैकी ८ कविता समाविष्ट झाल्या असून त्या संग्रहाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. तसेच अमरावती जिल्हा परिवर्तन आयोजित विचारवेध साहित्य संमेलन २०२५ मध्येही त्यांना पुरस्कार प्राप्त झाला.
कला आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रातही त्यांनी विशेष कामगिरी केली आहे. २०२३ साली त्यांना “मिस अमरावती हिरकणी” हा किताब मिळाला असून मिस महाराष्ट्र स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली होती. विविध फॅशन शो आणि मॉडेलिंगमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून २०२४ साली संदीपानी स्कूल येथे “Best Dance Performance Award” ने त्यांना गौरविण्यात आले.
लेखन ही त्यांची विशेष आवड असून “प्रतिलिपी मराठी” या अॅपवर त्यांच्या २०० हून अधिक कविता आणि लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमध्येही त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. अनेक कवी संमेलनांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी विविध पुरस्कारही प्राप्त केले आहेत.
त्यांच्या या यशस्वी प्रवासामागे त्यांचे पती डॉ. मंगेश कोल्हटकर यांचा खंबीर पाठिंबा आणि प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगी त्यांची साथ, विश्वास आणि प्रोत्साहन यामुळेच श्रद्धा कोल्हटकर यांचा जीवनप्रवास अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी झाला असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी सांगितले.
कुटुंबाच्या प्रेमळ साथीत आणि समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याच्या ध्येयाने त्या शिक्षण, साहित्य आणि कला या क्षेत्रांतून समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
0 Comments