*खामगांव,* दि. ०७ एप्रिल २०२६(उमाका) — खामगांव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे, अशा एकूण ७९ ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना आज दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये पिंप्री देशमुख, अडगांव, आंबेटाकळी, आवार, भंडारी, बोथाकाजी, चिंचपूर, ज्ञानगंगापूर, गणेशपूर, गारडगांव, गवंढाळा, घाटपुरी, गोंधनापूर, हिंगणा (का.), हिवरखेड, हिवरा खुर्द, जनुना, काळेगांव, कारेगांव बु., कोलोरी, कुंबेफळ, लाखनवाडा बु., मांडका, पाळा, पारखेड, राहुड, शहापूर, शिरजगांव दे., शिर्ला नेमाने, सुटाळा खुर्द, टेंभुर्णा, उमरा अटाळी, वाडी, वर्णा तसेच अंबिकापूर, अंत्रज, आसा, भालेगांव, बोरजवळा, चितोडा, ढोरपगांव, घाणेगांव, हिवरा बु., जळका भडंग, कदमापूर, कंचनपूर, कंझारा, खोलखेड, लाखनवाडा खुर्द, लांजुड, निमकवळा, निपाणा, पळशी खुर्द, पातोंडा, पिंप्री गवळी, पिंप्री कोरडे, पोरज, रामनगर, संभापूर, शेलोडी, शिराळा, सुजातपूर, सुटाळा बु., टाकळी, वाकुड, दधम, बोरी, पिंपळगांव राजा, निरोड, पिंप्राळा, विहीगांव आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सदर प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना परिशिष्ट ६ व नमुना ‘ब’ नुसार प्रसिद्ध करण्यात आलेली असून, यावर कोणताही आक्षेप अथवा सूचना असल्यास संबंधित नागरिकांनी दिनांक १३ एप्रिल २०२६ पर्यंत तहसिल कार्यालय, निवडणूक विभाग, खामगांव येथे लेखी स्वरूपात सादर कराव्यात.
तसेच, वरील ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व नागरिकांनी या अधिसूचनेची नोंद घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
000000
0 Comments