Advertisement

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत उंबरे दहिगाव मध्ये आजी माजी सैनिकांचा सन्मान

 *स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत उंबरे दहिगाव मध्ये आजी माजी सैनिकांचा सन्मान


*

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांचे संकल्पनेतून शनिवार दि.३०/४/२०२२ रोजी उंबरे दहिगाव मधील निवृत्त सुभेदार बाबासाहेब ठोंबरे, पॅरा कमांडो बाळासाहेब मकर, CRPF जवान बालाजी बनसोडे यांचे वतीने बंधू विशाल बनसोडे व मुंबई पोलीस माणिक ठोंबरे यांचा सन्मान ग्रामपंचायत उंबरे दहिगाव व जि. प. शाळा यांच्या वतीने सरपंच विष्णू नारनवर यांचे शुभहस्ते शाल,पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला. या प्रसंगी या सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा व ग्रामपंचायतचे आभार व्यक्त केले आणि गाव व शाळांबद्दल ऋण व्यक्त केले.





यावेळी मुख्याध्यापक विष्णू शिंदे, ग्रामसेवक एम के शिंदे, ग्रामस्थ व पत्रकार ज्ञानदेव तरंगे, किरण गोरे, सुनिल कसबे, जावेद होनवाड, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते 


.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मारकडवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार सुनिल कसबे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments