दिनांक 15 ऑगस्ट2023 रोजी श्री महादेव सुगदेवरव डामरे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्व सुगदेवराव चहादू डामरे आणि आई स्व सोनाबाई सुगदेवराव डामरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वडशिंगी हायस्कूल मधील ssc परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक आलेल्या सुपेश विजय देवचे 91.60%,शाळेतून द्वितीय क्रमांक विभागून कु ऋतुजा परमेश्वर घोगले 90% आणि कु गायत्री मनोहर खोद्रे 90%,मागासवर्गीय मधून प्रथम क्रमांक आलेल्या कु तेजस्विनी विजय भगत 88.20% यांचा रोख रक्कम,सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्य समिती च्या अध्यक्षा सौ गावंडे ताई होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जामोद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा श्री वामनराव फंड साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी मा प्रेमलाल जावरकर साहेब,लोकमत चे जेष्ठ पत्रकार मा श्री नानासाहेब कांडेलकर सर,पारितोषिक दाते मा श्री महादेव सुगदेवराव डामरे,वडशिंगी च्या सरपंच सौ शीतल सुनील वानखडे,मुख्याध्यापक श्री इंगळे सर, गणेश डामरे ग्रामपंचायत सदस्य ,पोलीस पाटील श्री अनंतराव ठाकरे,सोपानराव गोंड सर,माजी सरपंच भगवान देवचे हे उपस्थित होते.सदर गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्या साठी शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद,गावातील प्रतिष्ठित नागरिक, आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी आपला गुणवत्ता स्तर वाढवून आपल्या पालकांचे आणि वडशिंगी गावाचे नाव उज्ज्वल करून आपला शैक्षणिक उत्कर्ष साधून सामाजिक भावनेने गावाप्रति सेवाभाव कायम ठेवावा असे आवाहन पारितोषिक दाते मा श्री सुगदेवराव डामरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.
0 Comments