Advertisement

कृतज्ञता सोहळा जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा वडशिंगी,पं.स. जळगाव जामोद

प्रतिनिधी नागेश भटकर
दिनांक - 15 /8/ 2023 कृतज्ञता सोहळा
रात्र आहे तिथे ,दीप लावत जगु
झोपडी शोषितांची उजाडत जगू....दिनांक 22 जुलै 2023 ला जळगाव व संग्रामपूर या दोन तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आला . आणि आलेल्या महापुरातून आमची जिल्हा परिषद शाळा सुद्धा सुटली नाही . शाळेसह मुलांचे पुस्तक , वही , दप्तरांचे नुकसान झाले .अन मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.या टॅगलाईनने आमचा प्रवास सुरू झाला. शाळा स्वच्छ करत असतानाच मुलांच्या साहित्याचा प्रश्नही डोक्यात होताच .त्यामुळे आम्ही शाळेच्या वतीने
          हिम्मत द्या थोडी, उसळु द्या रक्त
          पैसा बिसा नको, दप्तर द्या फक्त....ही पोस्ट सोशल मीडियातून प्रसारित केली. या पोस्टला प्रतिसाद देत अनेक समाजसेवी संस्थांनी, व्यक्तींनी आम्हाला मदतीचा हात दिला अन आम्ही पुन्हा एकदा फिनिक्स प्रमाणे भरारी घेऊ शकलो. आमच्या शाळेतील सर्व 180 विद्यार्थ्यांना दप्तर वही पेन पेन्सिल असे वर्षभर पुरेल एवढे साहित्य या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आम्ही मिळवून देण्यात यशस्वी झालो.देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे....या सर्व दानशूर व्यक्तींच्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही. पण एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्हाला आर्थिक ,मानसिक , नैतिक मदत करणाऱ्या जवळपास 22 व्यक्तींचा सत्कार स्वातंत्र्य दिनाच्या औचित त्याने आम्ही *कृतज्ञता सोहळ्याच्या* माध्यमातून केला . या सोहळ्यास अधिकारी ,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावकरी मंडळी , विद्यार्थी व सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ नीलादेवी रामेश्वर मानकर अध्यक्षा, शाळा व्यवस्थापन समिती वडशिंगी
प्रमुख अतिथी सौ शितलताई सुनील वानखडे सरपंच
वामन फंड गटशिक्षणाधिकारी, जळगाव जामोद पी झेड जावरकर साहेब विस्तार अधिकारी जळगाव जामोद सत्कारमूर्ती अध्यक्ष, श्री संत तुकाराम नागरी सहकारी पतसंस्था, जळगाव जामोद संत गाडगेबाबा विचार मंच ,मलकापूर अभिनव हेल्थ क्लब, मलकापूर 
 किशोरजी केला, बुलढाणा अर्बन परिवार जळगाव जामोद राजश्री शाहू परिवार , जळगाव जामोद गुजराथी महिला मंडळ ,जळगाव जामोद
उमेद जिवोन्नती महिला बचत गट ,वडशिंगी मनीष भिकामचंद गांधी, जामोद गोपालराव रामभाऊ गाडगे, पातुर हरिदासजी बन्नातवाले, जळगाव जामोद कीर्ती विनीत टवानी ,अकोला दीपक शिवाजीराव वारांगणे ,जामनेर वसंता निनाजी शेकोकार ,मलकापूर महादेव गणपतराव खिरोडकार,मुंबई ऍडव्होकेट जनार्दन श्रीपतराव धंदर ,औरंगाबाद महादेव सुखदेवराव डांबरे औरंगाबाद उमेश सिताराम बघे ,आळंदी वकीलखान मेहबूब खान, वडशिंगी प्राध्यापक नानासाहेब कांडलकर ,जळगाव जामोद रामेश्वर बळीराम मानकर, वडशिंगी डॉक्टर नीलकंठ रणछोडदास राठी, वडशिंगी काशीराम वरणकर ,वडशिंगी या सर्वांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. वक्त बुरा था, बीत गया...आखिरकार मै जीत गया...पुनश्च सर्वांचे शाळेच्या वतीने आभार आणि धन्यवाद.....

Post a Comment

0 Comments