प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद तालुक्यातील टाकळी खाती येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातील मातंग समाज बांधवांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सामाजिक प्रबोधन तसेच स्थानिक सामाजिक सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. समाजाची दिशा आणि दशा बदलवायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे प्रतिपादन कैलासदादा खंदारे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन केले
. या कार्यक्रमासाठी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, जिल्हा उपाध्यक्ष विलास निकाळजे, सामाजिक कार्यकर्ते महादेव अडाळे, दैनिक देशोन्नती चे पत्रकार ज्ञानेश्वर. अडाळे, एमसीएन न्यूज मराठीचे गजानन खरात, लहूजी शक्ती शेना ता. अध्यक्ष कैलास डाखोरे. ता. उपाध्यक्ष दीपक रणशिंग ता. लहूजी शक्ती शेना ता. सचिव महादेव खरात .ग्राम शाखा अध्यक्ष योगेश भालेराव उपा अध्यक्ष उमेश पाटोळे समाधान रणशिंगे अमोल साबळे विशाल खरात . जी प .मराठी शाळा मुख्ाध्यापक चौधरी सर वाडसे सर स्थानिक ग्रामपंचायतीचे सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत अवसरमोल यांच्यासह असंख्य समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Comments