Advertisement

१७ वर्ष वयोगट बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन संघाची घोषणा मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी अर्णव निंबाळकर तर मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी कु.शरयू रेवस्कार

प्रतिनिधी नागेश भटकर
अहमदनगर येथे होणार सब ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा मलकापूर महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन व अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क बॅडमिंटन हॉल अहमदनगर येथे दिनांक २७ ऑगष्ट ते ०१ सप्टेंबरला सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या बुलढाणा जिल्हा संघाची घोषणा बुलढाणा जिल्हा बॅडमिंटन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव श्री.विजय पळसकर यांनी नुकतीच केली.
या वर्षीच्या संपन्न झालेल्या दोन जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा संघ तयार करण्यात आला असून हा संघ अहमदनगर येथील सब ज्युनिअर राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.मुलांच्या संघाच्या कर्णधारपदी खामगांव येथील अर्णव निंबाळकर व मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी जळगांव जामोद येथील कु.शरयू रेवस्कार यांची नियुक्ती संघटनेचे उपाध्यक्ष खिझर खान यांनी नुकतीच केली असुन संघ पुढीलप्रमाणे 
मुली संघ कु.शरयू रेवस्कार (कर्णधार )कु.रेवा पाचपोर कु.संयुक्ता पवार कु.शची पांडे कु.गोजिरी पाटील कु.सावणी पाटील मुले संघ
अर्णव निंबाळकर (कर्णधार)ओजस झोलेकर शरीलीन पवार परीक्षित आमले तन्मय इंगळे केशव वर्मा 
प्रशिक्षक श्री.राहुल जगदाळे सर सदर जिल्हा संघाचे प्रशिक्षण शिबिर दि.२१ ते २३  ऑगस्ट पर्यंत राहणार असून जिल्हा संघ अहमदनगर येथील सब ज्युनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता दि.२४ऑगष्टला रवाना होणार आहे.राज्यस्तरीय स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बॅडमिंटन स्पोर्ट्स असो.चे सचिव श्री.विजय पळसकर यांच्याशी संपर्क साधावा असे संघटनेतर्फे आव्हान करण्यात आले आहे. सदर जिल्हा संघाला जिल्हा संघटनेचे,मनीष लखानी, प्रा.कैलास पवार, प्रा.नितीन भुजबळ, हनुमंत भोसले,अजिंक्य टापरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments