Advertisement

गळफास घेऊन 26 वर्षीय जामोद येथील युवकाची आत्महत्या...

जळगांव जा.प्रतिनिधी:- नागेश भटकर 
जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील 26 वर्षीय शेतमजुरी वकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना जामून येथे दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री उघडकीस आली. जामोद येथील माळी खेळ भागात राम मंदिराजवळील रहिवाशी असलेला विजय महादेव अंबळकार वय वर्ष 26 या युवकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात लोखंडी अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा करून सेवविच्छेदन क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे मृतक तरुणाचे शव पाठविण्यात आले होते. सदर तरुणांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments