स्थानिक जळगाव जामोद शहरातील पेट्रोल पंपा जवळील जनक नगरी समोरील उदय कॉलनी येथे जाणाऱ्या रस्त्यालगत च्या विहिरीत 55 वर्षीय वृद्धेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली असता घटनास्थळी लगेचच पोलिसांनी जाऊन त्या वृद्ध महिलेला काही नागरिकांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले परंतु त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला होता.. ग्रामीण रुग्णालय येथील जय भवानी रुग्णवाहिकेला घटनास्थळी पाचारण करून वृद्धेचा मृतदेह शवविच्छेदन क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. या मृत वृद्धेची ओळख पटली असून त्या मृत वृद्धेचे नाव वेणु रामेश्वर पवार वय 55
वर्ष राहणार वाडी खुर्द जळगाव जामोद येथील असल्याचे समजते. घटनेचा पंचनामा जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल मस्के यांनी केला.. घटनेचा पुढील तपास जळगाव जामोद ठाणेदार दिनेश झांबरे यांचा मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.. यावेळी येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत असे म्हटले की जळगाव जामोद शहरामध्ये कित्येक सार्वजनिक विहिरी ह्या अशाच उघड्या स्थितीत पडलेल्या असून त्यांच्यावर पालिका प्रशासनाने जाळी लावून किंवा ज्या विहिरी मुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे अशा विहिरी निस्तनाबूत कराव्या जेणेकरून निरपराध नागरिकांचा जीव जाणार नाही..
0 Comments