Advertisement

एलसीबी पथकाची निमखेडी फाटा येथे धडाकेबाज कारवाई केला नऊ लाख 72 हजार रुपयाचा गाडीसह गुटखा जप्त

प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगाव जामोद दि 19: स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, व जळगाव जामोद पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्यासह एकूण 9 लाख 72 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे संजय राऊत यांनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे जळगाव जामोद हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना फिर्यादीला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी संदीप सुनील भावसार व किरण गोपाल येनकर दोन्ही राहणार आसलगाव हे दिनांक 18 ऑगस्ट संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास चार चाकी क्रमांक एम एच 48 ए टी 0482 मध्ये गुटक्याची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करीत आहे ही माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पीएसआय नारायण सरकटे पोलीस कॉन्स्टेबल कळस्कर व इतर स्टाफ यांनी निमखेडी येथे जाऊन वाहने चेक करीत असताना बातमीदारा कडून मिळालेल्या वर्णनाची चार चाकी येताना दिसली तिला थांबून तिची झडती घेतली असता त्या गाडीमध्ये तंबाखू गुटखा किंमत 5 लाख 52 हजार 840 रुपये, दोन मोबाईल किंमत 20 हजार रुपये एक मारुती कंपनीची गाडी किंमत 4लाख रुपये असा एकूण नऊ लाख 72 हजार 840 रुपयाचा मुद्देमाल सदर पथकाने जप्त करून ताब्यात घेतला आहे व सदर दोन्ही आरोपीवर कलम 328, 273 भांदवी सह कलम 26 अन्नसुरक्षा मानके अधिनियम सन 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहे

Post a Comment

0 Comments