काल दिनांक 19 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अकोला वरून सौ.प्रशंसा मनोज अंबेरे(अकोला महिला जिल्हाध्यक्ष) काही कामा निमित्त जात असताना हॉटेल तुषार समोर हायवे ची बिकट परिस्थिती झालेली दिसून आली. हायवे ला उजव्या बाजूला रोड व नाल्या मध्ये तीन ते चार फूट रुंद व पाच ते सहा फूट खोल असा गॅप पडलेला आहे. पहिल्याच पावसाळ्यात या हायवेची ही विकट परिस्थिती झालेली आहे तर येत्या काही वर्षात लाज वाटण्यासारखे सरकारचे काम जनतेपुढे आले आहे. हा ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरने रस्ता व नाला बनवलेला आहे त्याचे कान उघाढणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचा महामार्ग बनवलेला आहे. प्रशासनाला आता जाग येण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने मनसे स्टाईलने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिला. जनतेकडून टॅक्स घेता आणि जनतेला मृत्युमुखी पाडण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करतात. तुमचे खिशे भरण्यामुळे सामान्य जनता आपल्या परिवारातील एखाद्या या व्यक्ति जीव गमावू शकतो. सरकारला सामान्य जनतेचा पैसा अमुल्य की जीव हेच कळेना..
0 Comments