Advertisement

मेरी माटी, मेरा देश' मोहिमे अंतर्गत कृषीकन्यांकडून स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण !

प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांव जा. तालुक्यातील ग्राम वडगाव पाटण येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बी एस्सी (ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील कृषीकन्यांनी 'रावे (ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव) कार्यक्रमांतर्गत
'मेरी माटी, मेरा देश' व १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना आदरांजली दिली. वडगाव पाटण पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या आवारात तसेच ग्रामपंचायत परिसरात व रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र‌माच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रश्मी घुले, उपसरपंच सोपान वाघोदे, तसेच प्रमुख उपस्थितीत ग्रामसेविका कविता जंजाळ यांचा सन्मान करण्यात आला उद्यानविद्या महाविदयालयाच्या विद्यार्थीनींनी वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन यावर आपल विचार व्यक्त करून समस्त शेतकरी बांधव, गावकरी मंडळी व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वैष्णवी पाटील, ऋतुजा माळोदे, रुपाली सेलोटे, साक्षी ठोंबरे, श्रुती मालोकार ,सपना वाघ, सरस्वती सोळंके, प्रियंका पटोकार ,मोहिनी वाक्कर या विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला गावकरी मंडळी व मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विदयार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रितेश वानखेड व विषय तज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments