Advertisement

निवाणा गावामध्ये कृषीदुतानी वृक्षारोपण करून स्वातंत्र्यलढयातील वीरांना आदरांजली

निवाणा गावामध्ये कृषीदुतानी वृक्षारोपण करून स्वातंत्र्यलढयातील वीरांना आदरांजली
संग्रामपूर : तालुक्यातीन निवाणा येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बी. एस्सी हॉनर्स उद्यानविद्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यानी 'रावे [ ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव ] उपक्रमातंर्गत 'मेरी माटी, मेरा देश' व स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मंगळवारी वृक्षरोपण करून स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी चांगेफळ निवाणा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. ग्रामपंचायत आवारात, स्मशानभूमी परिसरात रस्ताच्या दुतर्फा वृक्षरोपण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. शोभा अवचार या होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीत उपसरपंच श्री. श्रीकृष्णा कोलतकार, ग्रामसचिव श्री. व्ही. के. कोथळकार, रोजगार सेवक श्री. विनोद उमरकार तसेच इतर ग्रा.पं. सदस्या, शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओम राठोड, तुषार राजगुरे , महेश शिंदे, ओम सापधरे, गौरव शिंदे , प्रणय समर्थ या विद्यार्थ्यानी परिश्रम घेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखेडे व विषय विशेषज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments