सेठ बि.जे.संचेती लोकसेवा ट्रस्ट मलकापूरद्वारा आयोजित साधू वासवाणी पुणे यांच्या सहकार्याने आज २० ऑगस्ट रोजी पर्यंत महावीर भवन मलकापूर येथे मोफत कृत्रीम पाय व हात शिबीर (आर्टिफिशियल लिम्ब कॅम्प) चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या हस्ते करण्यात आले.स्थानिक महावीर भवन येथे आयोजित कृत्रीम पाय व हात शिबिराच्या अध्यक्षस्थानी अमरसेठ संचेती हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये भाराकाँ शहराध्यक्ष राजूभाऊ पाटील, डॉ विजय डागा भाराकाँ मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, हनुमान सेना प्रमुख अमोल टप, संजय श्रीमाळ, मेजर नामदेवराव पाटील, अशोक संचेती, अमित संचेती, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम राठी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साधू वासवाणी यांच्या चमुने शिबिरामध्ये उपस्थित झालेल्या १०५ अपंग बांधवांची तपासणी केली. यामध्ये निवड झालेल्या अपंग बांधवांच्या हात व पाय याचे माप घेण्यात आले असून त्यांना लवकरच कृत्रीम हाप व पायाचे वाटप केले जाणार आहे.
शिबिर शिबिरावेळी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील सर, दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चोपडे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नागेश सुरंगे शरद खूपसे प्रकाश चोपडे राजीव रोडे पंकज मोरे किशोर केने अशोक पवार निलेश आढाव रामेश्वर गारमोडे अंकित नेमाडे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपप्रमुख अजय टप, शालीग्राम पाटील, बळीराम बावस्कार, अजीत फुंदे, शिवाजी भगत, अशोक गाढवे, किशोर पानट,अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे कलीम शेख, सचिन मोरे, निखील पोंदे यांचेसह आदी उपस्थित होते.
शिबिर यशस्वीतेसाठी हनुमान सेना, संजय श्रीमाळ त्यांची टिम, यशस्वीतेसाठी सेठ बि.जे. संचेती लोकसेवा ट्रस्ट, मूकबधिर मतिमंद विद्यालय, दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन व प्रहार जनशक्ती पक्ष, अपंग जनता दल संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments