प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत ही नेहमीच चर्चेत असते मागील पंचवार्षिक पाहता अपक्ष पाच व चार भाजपचे असे मिळून भाजपने सुनगाव ग्रामपंचायतवर सत्ता काबीज केली होती परंतु स्वतःच आपण विराजमान केलेल्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव पारित करून स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेतला होता व त्यानंतर त्याचाच फायदा घेत सूनगाव येथील शिवसेनेच्या विजयाताई पुंडलिक पाटील ह्या सरपंच पदावर विराजमान झाल्या होता होते त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा आज सूनगाव ग्रामपंचायतीला पाहायला मिळाली आहे व यावरून असा निष्कर्ष निघतो की सूनगाव ग्रामपंचायत वर भाजप हे फक्त अडीच वर्षच सत्ता करू शकते सुनगाव ग्रामपंचायत ची निवडणूक 2021 झाली होती त्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी रंगत लढली होती सूनगाव ग्रामपंचायतचे एकूण 17 सदस्य या रिंगणात होते त्यामध्ये जनतेने समसमान म्हणजेच भाजपला आठ व महाविकास आघाडीला आठ आणि एक अपक्ष असे सदस्य निवडून दिले परंतु भाजपने सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीमधील रामेश्वर अंबडकार ह्या सदस्याला पळवून त्याला सरपंच पदावर विराजमान केले व सूनगाव ग्रामपंचायत ही आपल्या ताब्यात घेतली परंतु ग्रामपंचायत कडून अडीच वर्षात कोणत्याच प्रकारे विकास होऊ शकली नाही म्हणजेच सुनगाव ग्रामपंचायतला सक्षम नेतृत्व लाभले नाही सरपंच रामेश्वर अंबडकार हे सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करीत नव्हते सूनगाव ग्रामपंचायत ही जनसामान्यांना सुख सुविधा देण्यास असमर्थ ठरली आहे सुनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांच्या बाबतीत एक ते दीड वर्षांपासून ठप्प पडलेली दिसत होती कोणतेच कामे होत नव्हती यालाच कंटाळून भाजपचे पाच सदस्य व महाविकास आघाडी यांचे आठ सदस्य अविश्वास प्रस्तावात सहभागी होऊन सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या विरुद्ध 13 जणांच्या सह्या असलेला प्रस्ताव 17 8 2023 रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांच्याकडे दाखल केला आहे या प्रस्तावावर गजानन गणपत दातीर कौशल्या दिनेश ढगे राहुल समाधान इंगळे दीपिका रामसिंग राजपूत देवा वानखडे द्रोपदी पांडुरंग गवई तोताराम निहाल रामकली निहाल
विमल समाधान काळपांडे सगिराबाई उमेद तडवी नंदा रियाज तडवी संतोष शत्रुघ्न वंडाळे श्याम भुरा निहाल या सदस्यांच्या सह्या आहेत त्यानुसार या ठरावासाठी 23 8 2018 रोजी मतदान होणार आहे त्यामुळे सुनगाव मध्ये एकच खळबळ उडाली आहे व त्यानंतर हा अविश्वास ठराव पारित झाला तर सुनगाव ग्रामपंचायतला सरपंच कोण विराजमान होणार व राहिलेली सर्व कामे ही अडीच वर्षात पूर्ण होईल अशी आशा बाळगत याकडे सूनगाव वासियांचे लक्ष लागले आहे
0 Comments