Advertisement

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा सातपुडा कॅम्पस मध्ये प्रारंभ

 प्रतिनिधी नागेश भटकर 
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ गरजेचे.डॉ. संदीप वाकेकर यांचे प्रतिपादन......
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी शालेय गटातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षी जळगाव जामोद येथील सातपुडा कॅम्पसच्या भव्य प्रांगणात 14, 17 व 19 वर्षीय मुले व मुली या गटांत विविध दहा खेळ प्रकारातील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील एकूण 45 संघाने आपला सहभाग नोंदविला आहे. पुढील 10 सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांचे उद्घघाटन सातपुडा शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. संदीप वाकेकर तथा महासिद्ध अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष डॉ. स्वातीताई वाकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 18 ऑगस्ट रोजी संपन्न झाले. खोखो, कबड्डी, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कुस्ती, योगासने, क्रिकेट, हॉलीबॉल व फुटबॉल असे विविध खेळ या स्पर्धेदरम्यान आयोजित केल्या जाणार आहेत. या स्पर्धेतील खोखो या खेळाचे चे सामने 22 ऑगस्ट रोजी पार पडले. यामध्ये 14 वर्ष वयोगट या प्रकारात जिल्हा परिषद शाळा भिंगारा विजयी व सातपुडा कॉन्हेट जळगाव जामोद चा संघ उपविजेता ठरला आहे.
तसेच 17 वर्षे वयोगट मुले या प्रकारामध्ये जिल्हा परिषद भिंगारा विजयी तर आदर्श विद्यालय मानेगाव हा संघ उपविजयी,19 वर्षे वयोगट मुले खोखो प्रकारात सातपुडा स्कूल ऑफ स्कॉलर्स जळगाव जामोद विजयी झाला आहे. तर खो-खो मध्येच मुलींमधून 14 वर्षे वयोगट खो-खो प्रकारामध्ये जिल्हा परिषद भिंगारा विजय तर चैतन्य प्राथमिक शाळा उपविजयी , सतरा वर्षे वयोगट प्रकारामध्ये आदर्श विद्यालय मानेगाव विजय व एस बी पटेल विद्यालय आडोळ उपविजयी आणि 19 वर्ष वयोगट मुलींमधून दि न्यू इरा हायस्कूल जळगाव जामोद चा संघ विजयी तर बी एस पटेल ज्युनिअर कॉलेज पिंपळगाव काळे चा संघ उपविजेता ठरला आहे. जळगाव जामोद तालुका क्रीडा आयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र भागवत, डी बी मानकर तसेच तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ह्या स्पर्धा संपन्न होत असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडाशिक्षक प्रतीक राऊत , आरिफ शिरसाटे, कुटे, वंदना कतोरे, जयकुमार पारस्कर, हरीश शर्मा यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

Post a Comment

0 Comments