Advertisement

नवनिर्वाचित प्राचार्य डॉ.विशाल तायडे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम स्वागत समारोह

 प्रतिनिधी नागेश भटकर
नवनिर्वाचित प्राचार्य डॉ.विशाल तायडे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम स्वागत समारोह
दि.२४/०८/२०२३ डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नीत व सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्वा.वीर.गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय,जळगाव (जामोद) येथे उद्यानविद्या महाविद्यालयाला लाभलेले नवनिर्वाचित प्राचार्य डॉ.विशाल तायडे यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्वा. वीर.गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, जळगाव (जामोद) चे प्राचार्य, प्रा.योगेश गवई सर व उद्यानविद्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रा.सतिश धर्माळ सर उपस्थित होते तसेच प्रा.प्रितेश वानखडे, प्रा.आकाश सुने, प्रा.जिव्हेश साळी,
 प्रा.तुळशीराम राठोड, डॉ.अनिकेत उमाळे, प्रा.अनिल घुगे, प्रा.अमोल सौदागर, प्रा.निखिल भोपळे प्रा.धीरज भोपळे, प्रा.अनुराधा चोपडे, प्रा.स्नेहल बायस्कर व इतर सन्माननीय प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी ठोंबरे ह्या विद्यार्थीनीने केले तसेच कार्यक्रम यशस्वी रितीने पार पाडण्याकरिता सातव्या  सत्राच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments