दिनांक १५ ऑगष्ट २०२३ रोजी अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता अकोट जि अकोला येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्सहात पार पडला.सकाळी ७-३० वाजता मुख्याध्यापक श्री एस व्ही पहुरकर यांचे हस्ते ध्जजारोहण करण्यात आले.त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धीरज गवई, सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेन्द्र ओईंबे व गौतम गवई यांचे प्रमुख उपस्थितीत शाळा ते देवरी फाटा अशी प्रभात फेरी काढण्यात आली.विद्यार्थी ,शिक्षक, कर्मचारी,सुरक्षा रक्षक व पालकांच्या उपस्थितीत हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम्,भारत माता कि जय,जय जवान जय किसान अशा जयघोषात रॅली देवरी फाट्यावर पोहोचली.अकोट तालुका पंचायत समिती सभापती श्रीमती हरीदिनीताई वाघोळे यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.त्यानंतर शाळेत विद्यार्थी भाषणे, राष्ट्रभक्तीपर गीते,शिक्षक भाषणे पार पडली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दिनांक १३-१४-१५ ऑगष्ट २०२३ कालावधीत मेरी माटी मेरा देश,पंचप्रण शपथ,हर घर तिरंगा, सेल्फी विथ तिरंगा हे उपक्रम शाळेत उत्साहात राबविले गेले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी अधिक्षक श्री रवीन्द्र जळमकर,शिक्षक श्री सागर कोवळे,जीरापुरे, दिनेश नेमाडे,मंगेश कडू,श्रीमती पखान,ब्रिक्स सफाईगार व सुरक्षारक्षक यांनी सहकार्य केले..
0 Comments