जळगांव जा.) ता. 13 - तालुक्यातील पळशी सुपो येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या - महाविद्यालयातील बी. एससी (ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विदयार्थ्यांनी रावे (ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव) अंतर्गत मेरी माटी मेरा देश" औचित्य साधून वृक्षारोपन करण्यात आले. या प्रसंगी पळशी सुपो ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात ग्रामपंचायत परिसरात तथा रसत्यांच्या दुतर्फा वृक्षारोपन करुण शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अनिता साईनाथ शिंदे या होत्या व उपसरपंच सौ. पंचफुलाबाई सुरेश अंभोरे तसेच ग्रामविकास अधिकारी श्री विजय ढगे व ग्रामपंचायत सदस्य श्री अर्जुन सातव व इतर सदस्य व कर्मचारी व समस्त गावकरी मंडळी श्री गुलाबराव रायपुरे, विनोद राजपूत, गिरीश बोटकार व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराग नारखेडे, आदित्य पाटील, सूरज पुंडे, सुजित म्हसाळ, कृष्णा रघुवंशी, रोहित महल्ले व इतर विद्यार्थीनी परिक्षम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विशेषज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मागदर्शन लाभले.
0 Comments