करमाळा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक (वर्ग 3 )खंडू मारुती रेंगडे याला 2500 रुपयाची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.तक्रारदाराने त्याच्या मोरवड(ता .करमाळा) हद्दीतील जमिनीची मोजणी करून हद्दी निश्चित करणे व हद्दी निश्चित केल्यानंतर त्याची नकाशा प्रिंट काढणे यासाठी तातडीच्या मोजणीसाठी अर्ज केला होता.
त्यासाठी आवश्यक असलेली शासकीय 3 हजार रुपये फी चलनाद्वारे भरली होती. यातील तक्रारदार यांनी शासकीय फी चलनाद्वारे भरलेली असताना देखील परिरक्षण भूमापक खंडू रेंगडे याने मोजणी करून हद्द कायम करणे व नकाशा प्रिंट काढण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाचे लाचेची मागणी केली. 3000 लाचीची मागणी केल्यानंतर तडजोडी आणती 2500 रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानंतरतक्रारदानाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवार (ता.25 ) रोजी लाच प्रतिबंधक विभागाने सापळा रचून खंडू रेंगडे यास 2500 रूपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
0 Comments