प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद दि 28:जळगाव जामोद पोलिसांनी दि 27 सप्टेंबर रोजी जामोद येथे अवैध्यरित्या गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या व्यक्तीवर छापा टाकत 57,300रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गावठी दारू नष्ट केली आहे याविषयी पीएसआय दोडकेनी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली आहे
पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या विशेष मोहिमे अंतर्गत ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शशिकांत दोडके, पी एस आय नारायण सरकटे, जी पी एस आय लक्ष्मण गव्हाळे, पो हे कॉ शेगोकार,पो हे कॉ तय्यब अली,पो हे कॉ देवचे, पो कॉ इरफान शेख, पो कॉ निशांत कळस्कर, पो कॉ परमेश्वर ढोण,पो कॉभारत बोंद्रे यांनी जामोद येथे पंचा समक्ष दिनांक 27 सप्टेंबर रोजी आरोपी मनसब खान रशीद खान यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता त्याच्या ताब्यातून 20 टीन पत्र्याच्या डब्यामध्ये प्रत्येकी 15 लिटर अशी 300 लिटर मोहासडवा, 2 बॅरल मध्ये प्रत्येकी 300 लिटर असा एकूण 600 लिटर मोहा सडवा, 3 लहान बॅरल मध्ये प्रत्येकी 60 लिटर प्रमाणे 180 लिटर मोहा सडवा, असा एकूण 1080 लिटर मोहासडवा किंमत अंदाजे 54 हजार रुपये व व 10 लिटर हातभट्टी दारू किंमत अंदाजे 1 हजार रुपये, 2 बॅरल किंमत 1 हजार रुपये, 20 टीन पत्रे डब्बे किंमत 1 हजार रुपये, तीन बॅरल किंमत 300 रुपये असा एकूण 57 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून सीए तपासणीसाठी 180 एम एल जप्त माल पंचा समक्ष सीलबंद ठेवला आहे व बाकी मुद्देमाल घटनास्थळी नष्ट केला आहे सदर आरोपीवर जळगाव जामोद पोलिसांनी कलम 65 ई एफ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे पुढील घटनेचा तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शशिकांत दोडके करीत आहे
ज्याप्रमाणे पोलिसांनी गावठी दारू बनवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे त्याप्रमाणे शाळा परिसरात गावठी व देशी दारू विकणाऱ्या वर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
0 Comments