Advertisement

गणेश विसर्जन करून येणाऱ्या मंडळाच्या वाहनाला ट्रकने धडक देऊन लागली आग

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
खामगाव:सतीफैल भागातील गणेश मंडळ जनुना तलाव येथुन गणेश विसर्जन करून घरी जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनाला जनुना चौफुल्लीवर ट्रकने जोरदार धडक दिली. ही घटना २७ सप्टेंबरच्या रात्री १२ वाजता दरम्यान घडली. यात यामधे १२ जण जखमी झाल्याची माहिती आहे.याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अकोलाकडे साबण घेऊन जाणारा भरभाव ट्रक एम पी ०९ एच जी ६४५५ ने गणेश विसर्जन करून जाणाऱ्या गणेश मंडळाच्या टेम्पोला वाहन क्रमांक एम एच ०४ एफ यू २४५ ला जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनातील गणेश मंडळाचे १२ जण जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान त्यामधील जाधव हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविले आहे तर य विनोद ढवळे व रिंकू गायकवाड दोघे जखमी असून ते खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ९ जखमीवर डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सदर ट्रक हा घटनास्थळवरच पेटून दिला. ट्रक चालक घटनास्थळ वरुन पसार झाला आहे.घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी पोहचले होते.

Post a Comment

0 Comments