मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर आज दि 19।9।23 मंगळवार रोजी गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर आरंभ ग्रुप तर्फे शेतकरी मेळावा आयोजित केला होता आणि तो यशस्वी रित्या पार पडला मेळाव्या करिता गावोगावातील होतकरू शेतकरी बंधूनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपली उपस्थिती दर्शविली ,शेतकरी बंधूंसाठी या वेळी अल्पोपहाराची सुवीधा सुध्दा उपलब्ध करण्यात आली .आरंभ ग्रुप तर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात आज आरंभ ग्रूप ने सुरू केलेला असंख्य गोष्टी वर प्रकाश टाकण्यात आला,मेळाव्यात आज आरंभ निधी आणि ट्रेडींग कंपनी चे संचालक श्री डॉ प्रफुल पाटील सर आणि सुरेश सातव सर हे उपस्थित होते कार्यक्रम ची प्रस्तावना ही बँक चे फिल्ड ऑफिसर असलेले प्रवीण राऊत सर यांनी मांडली त्या नन्तर सुरेश सातव सर यांनी आरंभ ग्रुप ने सुरू केलेल्या आणि सुरू होनाऱ्या उपक्रमा बद्दल आपले विचार व्यक्त केले ,ज्या मध्ये आरंभ ग्रुप का निर्माण केला गेला आरंभ ग्रुप शी जोडण्याचे लाभ आणि भविष्यात सर्व शेतकरी बंधूंना आरंभ तर्फे होणारे त्याचे फायदे याबाबद्दल माहिती देण्यात आली,कार्यक्रम बद्दल बोलताना सातव सर यानी आरंभच्या 5 घटका बद्दल माहिती दिली. ज्या मधे आरंभ कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स ,आरंभ निधि अर्बन लिमिटेड आणि आरंभ ट्रेडींग कंपनी तसेच पुढे सुरू होणाऱ्या आरंभ ऍग्रो सेंटर आणी आरंभ जीनिंग अँड प्रेसिंग तसेच शेवटी आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट बद्दलची माहिती ऐकून शेतकरी बंधूनी एक विश्वास आणि आनंद व्यक्त केला .काहीनि आपले मत सुध्दा व्यक्त केले. कार्यक्रम च्या शेवटी ग्रुप चे संचालक डॉ प्रफुल पाटील सर द्वारा एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला ज्यात 20 चांदीचे शिक्के विजेत्या शेतकरी बंधूंना सत्कार करून प्रदान करण्यात आले. आरंभ ही एक खाजगी संस्था नसून हा एक परिवार आहे आणि या परिवाराला जोडणार प्रत्येक जण हा आरंभ ग्रुप चा एक घटक आहे असे जाणुन आरंभ तर्फे राबवत असलेल्य सर्व योजनांचा लाभ हा प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन शेवटी ग्रुप चे संचालक डॉ प्रफुल पाटील सर आणि सातव सर यांनि केले ,
0 Comments