भाजपाचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना पत्रकारांना अपशब्द बोलून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांना बदनाम केल्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली संघाचे वतिने पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत पाठविले आहे.या निवेदनात जळगाव जामोद पत्रकार संघटनेने म्हटले आहे की, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या अपशब्दाचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहे. चांगल्या बातम्या छापून घेण्यासाठी पत्रकारांना चहा-पाण्यासाठी
बोलवा त्यांना धाब्यावर जेवू घाला असे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या मिडीयाबद्दल अपमानित करणारे उद्गार बावनकुळे यांनी काढले होते. पत्रकारांना अपमानित करणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्षांचा तात्काळ राजीनामा घेवून पदमुक्त करावे तसेच राज्य शासनाच्या गृह विभागाने बावनकुळे यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर ,उत्तम वानखेडे ,भिमराव पाटील ,लियाकत खान ,शिवदास सोनोने ,गोपाल अवचार ,जफर खान ,नागेश भटकर ,रामनिवास यादव, दत्तु दांडगे ,संतोष कुलथे ,विनोद चीपडे ,यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments