नांदुरा प्रतिनिधी राजेश काळे
नांदुरा पोलिसांनी पिंपळखुटा धांडे येथील विहिरीतील महिलेचा मृतदेह काढला बाहेर ओम साई फाउंडेशन च्या रेस्क्यू टीमची मदत
नांदुरा ग्राम पिंपळखुटा धांडे येथील सौ. कौशल्याबाई नि. धांडे वय ४५ वर्ष यांचा मृतदेह विहिरीत पडून असल्याची फिर्याद योगेश नि. धांडे यांनी दिनांक २६.०९.२०२३ ला नांदुरा पोलीस स्टेशनला दिली. पिंपळखुटा धांडे येथील किशोर निनाजी थांडे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यात तरंगत असणारा मृतदेह कौशल्याबाई नि. थांडे यांचा असल्याची जागेवर जाऊन खातर जमा केली. विहिरीतून वर काढण्याकरिता नांदुरा येथील समाजसेवी संस्था ओम साई फाउंडेशन ची रेस्क्यू टीमला बोलवण्यात आले रेस्क्यू टीमचे विलास निंबोळकर, पियुष मिहाणी, कमलेश बोके कृष्णा नालाट अश्विन फेरन, नितीन ठाकरे, राजू बगाडे या सर्वांनी नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी बीट जमदार काशीराम जाधव श्री मोरे साहेब संजय जाधव साहेब गिरी मॅडम आकाश भोलनकर साहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी यांचे समक्ष मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून तपास पोलीस यंत्रणेकडून सूरु आहे
0 Comments