खामगांव नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दस्तुर रतनजी ग्रंथालय खामगांव ची सर्वसाधारण सभा दि २४.०९.२०२३ रोजी संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. संस्थेच्या उपविधीप्रमाणे गणपूर्ती झाल्यामुळे अगदी वेळेवर सभा सुरु झाली.. ग्रंथालयाचे तत्कालीन अध्यक्ष स्व भागवत भाऊ ठाकरेङ यांचे अकाली निधन झाल्यामुळे सभेच्या सुरवातीलाच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.. त्यानंतर विधीवत सभेचे कामकाज सुरु झाले. सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष श्री शशीकांत भारंबे यांनी रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांची अविरोध निवड करावी हा प्रस्ताव ठेवला.. श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि राजकिय क्षेत्रात चांगला प्रभाव असून त्यांना प्रशासकीय कामाचाही अनुभव आहे.. त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाचा आणि राजकिय प्रभावाचा आपल्या संस्थेच्या आर्थिक व सांस्कृतिक भरभराटीस फायदा होऊ शकतो.. तसेच आपले वर्तमान संचालक मंडळ व दिवंगत अध्यक्ष यांची निवड सभासदांनी अविरोध करुन एक चांगला पायंडा पाडला आहे म्हणून नविन अध्यक्षांची सुध्दा अविरोध निवड करुन सभासदांच्या भावनांचा आदर करावा असा प्रस्ताव श्री भारंबे यांनी मांडला. या ठरावाला संस्थेचे संचालक श्री राजु भाऊ वानखडे यांनी अनुमोदन देतांना श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांनी जगप्रसिद्ध असलेल्या जहाँगीर आर्ट गॅलरीचे अध्यक्षपद भूषवून आर्ट गॅलरीचा सर्वागीण विकास करण्यास हातभार लावला आहे त्याच धरतीवर दस्तुर रतनजी ग्रंथालय या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारुन आपल्या संस्थेचीही भरभराट करावी अशी विनंती केली.. या ठरावास उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने सहमती देऊन टाळ्यांच्या प्रचंड कडकडात श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांची दस्तुर रतनजी ग्रंथालय खामगांव या संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली. सभेचे पुढील कामकाज श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु करण्यात आले. सर्व प्रथम संस्थेचे सचिव श्री अनंतभाऊ बनारे यांनी संस्थेचे लेखा पत्रक, अंदाजपत्रक तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेवरील विषयावर सांगोपांग चर्चा होऊन सर्व विषय सर्वानुमते दस्तुर रतनजी प्रथालय खामगांव CP 1889141) सर्व साधारण सभा 24.09.2023 मंजूर करण्यात आले.. त्यामधे मागील सर्व साधारण सभेच्या कारवाईस मंजुरात देण्यात आली, वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवालास मंजुरात देण्यात आली, वर्ष २०२३ २४ च्या अंदाज पत्रकास मंजुरात देण्यात आली, वर्ष २०२३ २४ करिता ऑडीटरच्या नियुक्तीस मंजुरात देण्यात आली. सभासदांकडून आलेल्या सुचनावर सांगोपांग चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. सर्वसाधारण सभेस श्री सागर भाऊ फुंडकर यांची विशेष उपस्थिती होती या प्रसंगी त्यांनी संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या सभेत सभासदांनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असून नवनिर्वाचित अध्यक्ष श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या निवडीचे स्वागत करुन आनंद व्यक्त करण्यात आला तसेच नविन अध्यक्ष महोदयांच्या अनुभवाचा, सामाजिक व राजकिय प्रभावाचा संस्थेला निश्चितच फायदा होईल किंबहुना नविन अध्यक्ष महोदयांनी त्यांच्या उच्च पदस्थ संपर्काचा संस्थेच्या हिताकरिता उपयोग करुन संस्थेची भरभराट करावी व खामगांव शहराचे नाव साहित्यिक विश्वात सुवर्ण अक्षरात लिहावे अशी विनंती मनोगत व्यक्त करतांना एलआयसीचे विकास अधिकारी राम भेलके, मावराव पाटील प्रतिक लोखंडकार. सुमित बेंद्रे. अरूण भटकर मोहन पांडे, राजकुमार बजाज, मुरारी टिपरे, हेमंत देशपांडे, रमेश गांवडे, देविदास धुरंधर, अर्जुन धंदर, मोरखडे साहेब, बबनराव आखरे, श्री घ्यार, श्री रुपेश पाकदाने इत्यादी मान्यवरांनी मत व्यक्त केले...
0 Comments