प्रतिनिधी...
नाईट ड्युटी ऑफिसर असलेल्या महिला पोलीस पीएसआय रंजना आवारे यांनी 25 सप्टेंबर च्या मध्यरात्री दीड ते दोन वाजे दरम्यान मध्य प्रदेशातून येत असलेल्या बोलेरो पिकप वाहनांमधून क्रूरपणे सात गोवंशीय जनावरांची वाहतूक करीत असताना पकडले.. जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे यांना फोनवरून माहिती मिळाली की खांडवी येथे अवैधरित्या गुरांनी भरलेले वाहन येत आहे. अशी माहिती मिळताच पीएसआय आवारे ह्या कॉन्स्टेबल सचिन शेळके यांना व खूफिया विभागाचे पवार यांना सोबत घेऊन खांडवी गाठले. त्या ठिकाणी बोलेरो पिकप वाहनामध्ये सात गोवंशीय जनावरे क्रूरतेने व अवैधरित्या वाहतूक करीत असताना आढळून आले. यावेळी खांडवी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. एकट्या महिला पोलीस कर्मचारी असताना सुद्धा पीएसआय रंजना आवारे यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवली.बोलेरो पिकप वाहन आरोपीसह पोलीस स्टेशन येथे आणून जमा केले. पीएसआय रंजना आवारे यांच्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आरोपी उका भगवानदास चव्हाण वय 54 व आरोपी नंदू उका चव्हाण वय 28 वर्षे दोघेही राहणार बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात प्राण्यांना क्रूरपणे वागविस प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 घ,ड,च, सहकलम130/177,158/177 मोटर वाहन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर दोन्हीही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके यांनी केली...
0 Comments