Advertisement

कोतवाल भरती मध्ये दिलेली साझा अंतर्गत रहिवासी अट रद्द करण्या करिता समाजवादी पार्टी बुलढाणा तर्फे जळगांव जामोद येथे उप विभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दिले

प्रतिनिधी 
तालुक्यातील उमेदवारांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी.राज्य शासनाने काढलेल्या कोतवाल भरती मध्ये जळगाव जामोद तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या १४ जागा भरण्यात येत आहेत.या जागा भरती प्रक्रियेमध्ये तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांनी काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये उमेदवार हा संबंधित साझा अंतर्गत रहिवासी असला पाहिजे असा जाहीरनामा काढलेला आहे. या अटीमुळे तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवार या कोतवल भरती पासून वंचित राहत आहेत.बाकी इतरत्र जिल्ह्यांमध्ये झालेल्या कोतवाल भरती मध्ये साझा ची अट घातलेली नव्हती.खरंतर कोतवाल पदाच्या जागा ह्या काही वर्षानंतर निघतात आणि अशा या परिस्थितीमध्ये शासनाने साझा ची घातलेली अट ही अट उमेदवारांवर अन्यायकारक आहे.त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर दिसुन येत आहे. तरी ही अट रद्द करा ही मागणी घेऊन समाजवादी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अझहरउल्लाह खान महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान युवा जनसभा बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शेख युनुस, जिल्हा उपअध्यक्ष अब्दुल रहीम खान , जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद ,जळगांव शहर अध्यक्ष सैय्यद नफीस, अब्दुल सादिक तालुका अध्यक्ष युवजन सभा रसुलपुर , हशमात खान रसुलपुर तालुका उपअध्यक्ष, सैय्यद सोहेल ,जळगांव जामोद, तसेच समाजवादी चे बहुसंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उप विभागीय अधिकारी साहेब यांना कोतवाल भरती संबंधित मूळ साझा रहिवासी अट शिथिल करणे बाबत निवेदन सादर केले .

Post a Comment

0 Comments