Advertisement

शेतकरी राजा साठी बसलेले राजेश काळे मनसे तालुका उपाध्यक्ष नांदुरा यांनी 10/10/23 रोजी पासुन आमरण उपोषण सुरू

शेतकरी राजा साठी बसलेले राजेश काळे मनसे तालुका उपाध्यक्ष नांदुरा यांनी 10/10/23 रोजी पासुन आमरण उपोषण सुरू

प्रतिनिधी 
माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना निवेदन देऊन आमरण उपोषणाला केली सुरुवात तारीख 10 10 2023 माळेगाव गोंड, खडदगाव, लोनवाडी, पिंपळखुटा धांडे येथील शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब नांदुरा यांना निवेदन देऊ नही त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही.
आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नांदुरा तालुक्याच्या वतीने वरील विषयांकित व संदर्भांकित विषय अनुसरून आपणास दिनांक 23 नऊ २०२३ रोजी रात्रीपासून दिनांक 24 9 2023 सकाळी पाच वाजता पर्यंत सारख्या ढगफुटी अतिवृष्टी झाले. या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेताचे व तोंडी आलेला घास पावसाने संपूर्ण शिवारामध्ये नुकसान दिसून येत आहे.
तरी आतापर्यंत कुठल्याही मदतीला शासन समोरील आले नाही. तसेच मृत्युमुखी पडलेले पशु तसेच गावातील घरामध्ये शिरलेले पाणी व शेतीमाल पूर्ण प्रमाणात खराब झाल्याचे दिसून येत आहे. शेतामध्ये तलाव झाल्यामुळे पिकांचे खूप प्रमाणात शिवारातील नुस्कान दिसत आहे. शेत जमीन मध्ये आवेगाने पाणी घुसून शेत शिवार खरडून टाकणे. काडीस आलेले पीक उखडून टाकणे. शेत रान उध्वस्त करणे. शेतामधील शेती उपयोगी माती वाहून नेऊन नद्यांना मिळवली. ज्या शेताचे नुकसान खरडलेले शासन त्या शेतकऱ्यांना विशेष निधी शेती पिकायोग्य करण्याकरिता काय उपाययोजना करणार?
 निसर्गाने अनियमित झालेला पाऊस पिक विमा कंपन्यांना तहसीलदार साहेब कधी आदेश काढणार?
तहसीलदार साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार १२५ घर पडझड 76 जनावर वाहुन गेली अकरा जनावर मृत्यू पडले आहेत.
शेतकऱ्याच्या मालाची झालेली नुकसान शासन दरबारी कधी मांडणार व त्यांना मोबदला कधी मिळणार?
यांची सर्व शिवारातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये पिक विमा कंपन्या देण्याच्या आदेश कधी काढणार?
जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली व मृत्युमुखी पडलेली असतील त्यांना असी अपेक्षा आहे की शासन आपल्याला मदत कधी देणार?
सर्वातून महत्त्वाचं म्हणजे तालुका कृषी अधिकारी यांनी ढगफुटी बद्दल काय भूमिका घेतली?
वरील सर्व विषयांचे नोंद कधी सुटणार?
 १) मनसे तालुका उपाध्यक्ष 
*राजेश रामराव काळे यांच्या मित्रासोबत घडलेला प्रसंग*
माय माऊलीच्या माहेर वरून त्यांना दिलेल्या भेटवस्तू आमच्या आई बहिणी हातात टेकवतात व बोलतात हे कधी कामात पडणार हे घ्या व शेत पेरायला बिजवाई आना पेरणी केल्यानंतर काय ते सोयाबीन किंवा कापूस वेचला की आई बोलली कपडे घेऊ. असा प्रसंग मी माझ्या एका मित्राच्या तोंडातून ऐकण्यात आलेले आहे.
दोन बोंडव देवाला ठेवावे व जो कापूस तीस किलो विकून कपडे व शाळेचे लेटर पेन्सिल आणलेली आहे . दिवाळीला शेतकऱ्याची बहिण येते त्यावेळी कसे प्रसंग घडतात ते तर खूप वाईट आहे. स्वतःच्या मुलाला कपडे घेत नाही व आपल्या बहिणीच्या मुलाला कपडे घेतो. (तुम्हा वाचकांच्या माहिती करिता 30 किलो कापूस विकलेला असतो) त्या मुलाची आई त्या मुलाला कानात सांगते बाळा तुझ्या बाबांनी नाही घेतले तर काय झालंय आपण मामाच्या घरी गेलो की मामाला तुला घ्यायला सांगतो. मुलगा खुश होऊन जातो.
पण तिला काय माहित आपल्या भावाला दोन वेळच्या जेवनाची सोय करायला उसणवार करावी लागते आहे. पहिला व दुसरा दिवस बहीण भावाकडे थांबते. दुसऱ्या दिवशी भाऊ मुलाला कपडे आणायला येईल असे बहिणी ला वाटते परंतु तोही दिवस तसाच निघून जातो.बहीण रात्रभर विचार करत राहते दादा का मुलांना कपडे आणायला गेला नसेल. विचार करून करून तिला झोप लागते. दिवस निघाला तिसरा मुलगा खूप व्याकूड झालेला आहे. मामा भगवती फिरत आहे. पण मामा काय करणार त्याच्याजवळ काही उरलेले नाही. मामाच्या लक्षात आलेलं असतं. मामा दोन दिवस झाले गावभर फिरत आहे. कोणी उधार उसने पैसे देत काय दोन दिवस फिरून त्याला काही मिळत नाही.त्याच दबक्या आवाजात भाऊ बहिणीला म्हणतो बाई या वेळेस काही पिकले नाही. खूप कर्जबाजारी झालो. आणि कामधंदा मिळाला नाही. काहीच मागे उरले नाही बहीण मोठ्या मनाने म्हणते मला काही नाही पाहिजे तू चांगला आहेस ना माझ्या मुलांना सुद्धा काही नाही पाहिजे. तेवढ्यात तो मुलगा रडायला सुरुवात होते तो काय करणार त्याची सहन करण्याची क्षमता संपत्ते तो मुलगा जोर जोरात ओरडायला सुरुवात करतो. हे दिवस शेतकऱ्यांच्या मुलावर येतात त्याची काय चुकले की त्याची दिवाळी सुद्धा बिना कपड्याची जाते असे प्रसंग का शेतकरी मुलाला किती सहन करायचे हे तर एक शेतकऱ्याला लहान भाऊ आहे म्हातारा बाप आहे असे खूप नाते आहेत. त्यांच्या पूर्ण गरजा कशा पूर्ण करणार हे फक्त त्यांची त्यालाच माहीत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण नाही झाल्या तर शेतकरी काय करणार. एवढी त्या मित्राचे चित्र तुमच्यासमोर मांडतो व त्या मित्राचा निरोप घेतो...
२) याला कारणीभूत आहे एक तर त्यांच्या निसर्गात तुम्ही तुमच्या सोयीसाठी बदल करायला लागले. त्यांची अंतिम यात्रा निघते पण त्याला त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता येत नाही. आता काय ते ऑनलाईन आलं नवीन काही करावं ते होत नाही फक्त शेतकऱ्यांच्या पैशाचा चुरा करत लावला शेतकऱ्याला किती ऑनलाईन काही लिमिट असतं. पिक पेऱ्यापासून ते विकेपर्यंत शेतामध्ये जाता येत नाही तरी पावसाच्या पाण्यात जा व तक्रार करा तक्रार होत नाही आणि लाभापासून शेतकरी वंचित राहतात.
३) शेतकरी राजाने कोरोना मध्ये तुम्हा सर्व जणांना उपाशी ठेवलं नाही त्या शेतकऱ्याला हे दिवस तुम्ही त्याला आमरण उपोषण करायला भाग पाडलं आहे. हे पूर्ण शेतकरी बांधव यांच्या जोपर्यंत त्यांच्या मालाचा मोबदला झालेल्या पिकाचे नुकसान व आर्थिक नुकसान पूर्ण शासनाने देईपर्यंत मी राजेश काळे , कडु बदामाच्या झाडावर आमरण उपोषण सुरूच ठेवणार तुमचाच शेतकरी मित्र.......

Post a Comment

0 Comments