Advertisement

लोकशाहीच्या पवित्र मंदिराची विटंबना थांबवण्यासाठी स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवाराला मतदान करागजानन हरणेप्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

लोकशाहीच्या पवित्र मंदिराची विटंबना थांबवण्यासाठी स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवाराला मतदान करा
गजानन हरणे
प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
 अकोला..देशाच्या लोकसभेमध्ये १५० गुंड , भ्रष्टाचारी, वेभीचारी जनप्रतिनिधी पाठविल्यामुळे लोकसभेचे ,विधानसभेचे समशानघाट झाले आहे. संसदेमध्ये गुंड शाहिने कळस गाठला गेला आहे.त्यामुळे लोकशाहीचे पवित्र अशा मंदिराची विटंबना भ्रष्ट लोकप्रतिनिधी करीत असताना सर्व जगाने पाहिले आहे. पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जनप्रतिनिधी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाणार नाही यासाठी मतदारांनी दक्ष राहून येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जागृतपणे जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीच्या पवित्र मंदिराची विटंबना थांबवण्यासाठी स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन बहिरखेड येथील मारुती मंदिरामध्ये आयोजित मतदार जनजागृतीला सभेला संबोधताना गजानन हरणे समन्वयक भारत राष्ट्र समिती अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ यांनी केले. भारत राष्ट्र समितीच्या वतीने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये महात्मा गांधी जयंती पासून मतदार जनजागृती अभियान राबवल्या जात असून या माध्यमातून गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती, कायद्याची माहिती ,समितीचे उद्देश ,ध्येय, धोरण याचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे .तसेच त्या गावांमध्ये ग्राम शाखा स्थापन करण्यात येत आहे .आजपर्यंत या अभियानांतर्गत ७५ गावांना ग्राम शाखा स्थापन करण्यात आले असून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावात बैठक व त्या गावात शाखा काढण्याचे उद्देश ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीचे संचालन आभार प्रदर्शन मंगल गावंडे यांनी केले बैठकीला गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवट प्रश्नोत्तराने झाला.

Post a Comment

0 Comments