Advertisement

करतवाडी रेल्वे येथिल श्रमदान उपक्रमात नागरिकांचा पुढाकार ग्रा पं करतवाडी रेल्वे येथे "एक तारीख -एक तास स्वच्छता

अकोट प्रतिनिधी अमोल राणे
 श्रमदान उपक्रमात नागरिकांचा पुढाकाराने स्वच्छता उपक्रमाचा कार्यक्रम संपन्न . मुख्य कार्यकारी अधिकारी,बी वैष्णवी यांचे आवाहनाला 
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कश,स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२अंतर्गत स्वच्छता ही सेवा या उक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील गावात आणि गावातील प्रत्येक कुटूंबापर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार (एक तारीख एक तास श्रमदान) असा उपक्रम *१ऑक्टोबर २०२३* रोजी जिल्ह्याील सर्व ग्रामपंचायींमध्ये हा उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात येणार असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विभाग प्रमुख,अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, महीला बचत गट, स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मोठ्या संख्येन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी केले होते.२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत* ‘स्वच्छता ही सेवा’  अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त १ ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागातून एक तास श्रमदानाव्दारे स्वच्छता करण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्याकरिता रहिवासी क्षेत्र, आसपासचा परिसर, आंगणवाडी परिसर, शाळा व तसेच या गावातील महत्त्वाच्या ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

श्रमदान उपक्रमा वेळी मी माझा कचरा उघड्यावर फेकणार नाही, त्याची योग्य विल्हेवाट लावेन, मी माझ्या घरातील सांडपाणी उघड्यावर सोडणार नाही, त्यासाठी घराच्या शेजारी शोष खड्डा करेन, मी माझ्या शौचालयाचा नियमित वापर करेन आणि स्वच्छ ठेवेन अशी प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गावचे प्रभारी सरपंच रमाताई रामहरी पेटे, ग्रा पं सदस्या सौ रजनीताई अमोल राणे,राधाकिसन पेटे, प्रमोद आढे, ग्रा पं कर्मचारी श्रीक्रुष्ण किरडे,ग्रा.रो सेवक अमोल राणे गावचे माजी पोलीस पाटील अशोकराव किरडे,रामहरी पेटे, गोकुळ पेटे, नलुताई किरडे,छायाताई किरडे,योगिता किरडे, मंजुषा राणे, रुपाली पेटे, देविका किरडे, सिताताई झास्कर,शुभांगी आपोतीकर , सविता जाधव रमाबाई आपोतीकर वनिता किरडे,आदी मंडळी ची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments