Advertisement

डॉक्टर राजेंद्र सोनोणे यांचा आणखी एक नवा विक्रम हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर

डॉक्टर राजेंद्र सोनोणे यांचा आणखी एक नवा विक्रम

 हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर 
अकोला येथील सुप्रसिद्ध डॉक्टर राजेंद्र सोनोणे यांनी लांगकावी मलेशिया आयर्न मॅन स्पर्धा यशस्वी रित्या पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लांगकावी मलेशिया आयर्न मॅन ७०.३ ह्या स्पर्धेत दिनांक 7ऑक्टोंबर रोजी डॉक्टर राजेंद्र सोनोने यांनी यशस्वीरित्या ७:४५ तासात पुर्ण केली. १.९ किमी समुद्रात पोहून झाल्याझाल्याच ९० किमी पहाडातील घाटातील रस्त्यावर सायकल
चालविणे आणि ते संपल्या संपल्या च २१.१ किमी अंतर धावून पुर्ण करणे. हे करण्यासाठी प्रत्येक लेग हा विशिष्ट वेळातच पुर्ण करावा लागतो ही येथे उल्लेखनीय बाब .स्पर्धेच्या सुरूवात ते शेवट ह्यासाठी एकुण ८:३० तास असतात. ही स्पर्धा काल डॉक्टर राजेंद्र सोनोने यांनी यशस्वीरित्या ७ तास ४५ पुर्ण केली. ह्या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातुन सह भागी होणारे डॉक्टर राजेंद्र सोनोने हे पहिलेच
खेळाडू आहेत.या अगोदर अकोला येथील सुप्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ. सौ. अंजली राजेंद्र सोनोने आणि सुरेखा दिलीप सोनोने ह्या एकाच कुटुंबा तील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर, धोका दायक अश्या एव्हरेस्ट बेस कॅम्प ची गिर्यारोहणाची खडतर मोहीम यशस्वी रीत्या पूर्ण करून अकोल्या च्या गिर्यारोहण मोहिमेत एक नवा इतिहास रचला आहे. ज्या अकोला जिल्ह्यातील ह्या दोन महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहिम फत्ते करणे ही एक राज राजेश्वर नगरी साठीच नव्हे तर पुर्ण जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. यांच्यासोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनी सुद्धा ह्या गिर्यारोहणाच्या मोहिमेत भाग घेऊन एकाच कुटुंबा तील तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची ही अकोले करां साठी प्रथमच वेळ होती.

Post a Comment

0 Comments