Advertisement

भोंडला उत्सव म्हनजे भुलाबाई ऊत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

भोंडला उत्सव म्हनजे भुलाबाई ऊत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
बाळासाहेब नेरकर कडुन

महाराष्ट्रात भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत महिनाभर भुलाबाईचा उत्सव मोठ्या थाटामाटात घरोघरी साजरा केला जातो. यालाच भोंडला उत्सव म्हणतात. आपली सनातन कालीन महाराष्ट्रीयन परंपरा कायम राहावी त्याचे महत्त्व या मोबाईल यूगात ग्रामीन भागातील खेड्यापाड्यातुन जपताना दिसते आज दिनांक 29 ऑक्टोबर20 23 रवीवार रोजी राञीनऊ वाजता गावातील मुली आपआपल्या घरी ताटे असलेल्या धांड्याच्या खोपडी मंडपात भुलजा भुलाबाईंना पाटावर बसवण्यात आले. ज्वारीच्या धांड्यांचा मखर त्यांच्याभोवती ठेवण्यात आला दीपप्रज्वलन करुन बाहुल्यांचे पूजन व त्यांना हार अर्पण करण्यात आले. 'पहिली ग पूंजा बाईपासून तर अडकित जाऊ का खिडकीत जाऊ' पर्यंत तर ऐक निंबु झेलुबाई असे संपूर्ण गाणे मुलींनी तालासुरात गायले. विदर्भातील हा लोककथा-गीत-कला प्रकार हा लग्न झालेल्या व लग्न होनार्‍या मुलीना सासर माहेर मधील प्रसंगाशी कसे मान आदर सन्मान पती सासु सासरे दिर सर्व पाञाशी कसे वागने असे याचे मजेशीर पण अर्थपुर्ण असा भुलाबाईच्या गीतांचा सर्वानी आनंद घेतला. नंतर सर्वांना भातकूल प्रसादाचे वाटप करतात. अशा प्रकारे भोंडला उत्सव अति आनंदात व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments