Advertisement

मनसे शेतकरी विंग तर्फे शेतकऱ्यांना सेफ्टी किट वाटप प्रतिनिधी यवतमाळ

मनसे शेतकरी विंग तर्फे शेतकऱ्यांना सेफ्टी किट वाटप
प्रतिनिधी यवतमाळ
वडगाव (जं) : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यवतमाळ जिल्हाध्यक्ष गजानन पोटे यांच्या तर्फे मनसे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्याच्या आरोग्याची काळजी म्हणून वडगाव जंगल व परिसरातील शेतकरी बंधूंना मोफत फवारणी सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला सोबतच नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे आरती संग्रहाचे वाटप करण्यात आले फवारणीच्या सेफ्टी किट गरजू शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे व परिसातील लाभार्थी शेतकरी, सामान्य वर्ग समाधान व्यक्त करीत आहे. मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. गजानन पोटे यांच्यातर्फे ही योजना राबविण्यात आली. कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना शेतकऱ्याच्या शेतातील लाईन समस्या बद्दल बोलत त्यांनी सांगितले की लवकरच तो विषय मार्गी लावण्यासाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी त्याच्या सोबत एकत्र येऊन लढा द्यावे. यावेळी परीसरातील शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन केले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन पोटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, अँड. अमित बदनोरे शहर अध्यक्ष यवतमाळ , अभिजीत नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अनुप देठे, वैभव आसुटकर, राहुल हेलुंडे, पवन गावंडे, यश शिदोडकार, सुमित महाकुलकर, यश कोराणे, वैभव देठे,शुभम गावंडे, पुष्कर सावरकर व परीसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments