Advertisement

ज्ञानेश्वरी प्रणित ज्ञानप्राप्ती - मार्ग आणि उद्देश" विषयावर प्रबोधन

ज्ञानेश्वरी प्रणित ज्ञानप्राप्ती - मार्ग आणि उद्देश" विषयावर प्रबोधन
प्रतिनिधी जळगाव जामोद 
सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद द्वारा संचालित व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सखारामपुर, चावरा-इलोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना “शाश्वत विकासासाठी युवक” या संकल्पनेवर आधारित श्रमसंस्कार विशेष शिबिरामध्ये आज दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी बुलढाणा येथील सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ, ग्रामगीताचार्य व मराठी विषयातील डॉक्टरेट पदवी प्राप्त ह.भ.प. डॉ.विकास बाहेकर ह्यांनी “ज्ञानेश्वरी प्रणित ज्ञानप्राप्ती - मार्ग आणि उद्देश” या विषयावर विद्यार्थ्यांना तसेच गावकऱ्यांना प्रबोधन केले आणि सोबतच डॉ.अनंतराव सिरसाट (माजी कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय सेवा योजना, अमरावती विद्यापीठ आणि विद्यमान प्राचार्य, बालाजी कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय, वालसावंगी, जिल्हा- जालना) यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान जळगांव जामोद शहरातील स्पर्धा परिक्षा विशेषज्ञ श्री.सचिन वारुळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बाबत उत्तम मार्गदर्शन केले आणि डॉ.विकास बाहेकर यांचा परिचय सर्व उपस्थितांना करून दिला.

डॉ.विकास बाहेकर हे संत साहित्याचे अभ्यासक असून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे अभ्यासू प्रवचनकार आहेत. गेली 22 वर्षापासून त्यांनी वारकरी सांप्रदायिक कीर्तनातून लोक प्रबोधन करीत आहेत तसेच महापुरुषांचे चरित्र, संत साहित्य व पसायदान नियमीत व्याख्यानाव्दारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

आज पार पडलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात डॉ.बाहेकर यांनी धर्म ह्या विषयाची संकल्पना मांडली व विद्यार्थ्याना धर्मा पेक्षा राष्ट्र धर्म किती महत्त्वाचा आहे यावर प्रकाश टाकला. तसेच अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्या विरोधात प्रचार आणि शिक्षण, आरोग्य आणि अध्यात्म यातील सकारात्मक पैलूंचा प्रसार केला. ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश आटोळे, उद्यानविद्या महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिकेत उमाळे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.दत्ता तायडे, प्रा.प्रमोद डव्हळे, प्रा.प्रितेश वानखडे, प्रा.कु.सोनाली चव्हाण, प्रा.कु.स्नेहा निर्मळ, प्रा.कु.अनिता इंगळे, प्रा.कु.प्रतिक्षा बोरखडे उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments