Advertisement

महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगाव तर्फे 33 बटुंवर उपनयन संस्कार सोहळा संपन्न* खामगाव(संतोष आटोळे )

*महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगाव तर्फे 33 बटुंवर उपनयन संस्कार  सोहळा संपन्न*
 खामगाव(संतोष आटोळे )          महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगावच्या वतीने येथील ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात 8 मार्च 26 रोजी सर्व प्रांतीय व सर्व भाषीय ब्रह्म वृंदाचा उपनयन संस्कार सोहळा समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला.
                  या सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्य भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, नगराध्यक्षा सौ.अपर्णा फुंडकर, न. पा.उपाध्यक्षा सौ.संतोष पुरोहित, जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, बुलढाण्याचे माजी नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे, माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा, सागर फुंडकर आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले होते 
          यावेळी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत ब्राह्मण समाज बांधवांच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन ब्राह्मण सभा खामगाव तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे व कार्याचे तोंड भरून कौतुक केले आणि ब्राह्मण सभेच्या वतीने भविष्यात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी वैयक्तिक दोन लाख रुपयांची मदत देण्याची जाहीर केले व बटूंना शुभ आशीर्वाद दिले.कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ब्राह्मण सभा खामगाव तर्फे गेल्या अनेक वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या उपनयन संस्कार सोहळ्याचे कौतुक केले व ब्राह्मण समाज बांधव नेहमीच आपल्या पाठीशी उभा राहिला असल्याचे सांगून बटूंना आशीर्वाद दिले. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी ब्राह्मण समाज खामगावला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन देऊन बटूंना आशीर्वाद दिले ब्राह्मण सभा खामगाव चे अध्यक्ष एडवोकेट शेखर जोशी यांनी ब्राह्मण सभेतर्फे भविष्यात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती व ब्राह्मण सभेने आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.


ब्राह्मण सभा खामगाव तर्फे भास्कर जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार या सोहळ्यात देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र अमोल जोशी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. या उपनयन संस्कार सोहळ्यात बल्लारपूर, वर्धा,हिंगणघाट,यवतमाळ, उत्तर प्रदेश,अकोला, शेगाव, खामगाव व जळगाव जामोद येथील 33 बटनवर उपनयन संस्कार करण्यात आले. पौरोहित्याचे काम भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील योगेश मुकुंद जोशी व यावल येथील निखिल वैद्य यांनी केले 7 मार्च रोजी बटूंची येथील रामनगर भागातील श्री प्रल्हाद महाराज राम मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन आशिष सराफ यांनी तर आभार प्रदर्शन मोहन कुलकर्णी यांनी केले.या उपनयन संस्कार सोहळ्यास रेणुका माता संस्थान माहूरचे मुख्य पुजारी दीपक कन्नो, एडवोकेट विनोद भडंग, एडवोकेट अमोल अंधारे, अकोला येथील श्री व सौ अभ्यंकर, दिलीप राय यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव आजी-माजी नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments